नंदुरबार (जिमाका वृत्त) : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे जून महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 3 जुलै, 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज सोमवार दि. 3 जुलै, 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून सादर करावेत, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.