नंदुरबार (जिमाका वृत्त) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत इयत्ता 10 वी 12 वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली असून जे पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर केले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्विकारण्याची दिनांक 14 जुलै, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकानुसार दिली आहे.

या योजनसाठी सन 2022-23 या वर्षात पात्र विद्यार्थ्यांकडून दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज स्विकारण्यात आले होते. तथापि, अद्यापही जे पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर केले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्विकारण्याची दिनांक 14 जुलै, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यासाठी पात्र विद्याथ्यांनी त्यांचे परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार या कार्यालयास सादर करावेत असे आवाहनही श्री. नांदगांवकर यांनी केले आहे.