नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 1 ऑगस्ट, 2022 रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज सोमवार 1 ऑगस्ट, 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे उपस्थित राहून सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.