नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शेतकरी आत्महत्या निर्मुलन व सहाय्यता समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक अशोक चाळक आदी उपस्थित होते.
बैठकीत शहादा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे चार प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी एक प्रस्ताव पात्र तर तीन प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. पात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार मदत देण्याच्या सूचना यावेळी डॉ.भारुड यांनी दिल्या.