नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : विमला सुखिदेवी चंपालालजी तातेड ओसवाल परिवारतर्फे जिल्ह्यासाठी एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत सुखिदेवी तातेड यांनी रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्याकडे सुपूर्द केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, बीजेएसचे गौतम जैन तातेड, अशोक तातेड, सुरेश तातेड आदी उपस्थित होते.

तातेड ओसवाल परिवाराने यापूर्वीदेखील जिल्ह्यासाठी 100 ऑक्सिजन कॉन्स्टन्ट्रेटर भेट दिले आहेत.