विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या सहाय्याने नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय नंदुरबार मार्फत दि
१० डिसेंबर २०२२ रोजी विद्यापीठ स्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील न्या. व्ही. एन मोरे, न्या. ए. आर .कुलकर्णी, न्या. एस. बी .मोरे, जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री, पोलीस उपअधीक्षक श्री सचिन हिरे, कारागृह अधीक्षक, श्री आर आर देशमुख, संस्थेचे चेअरमन मा. आ. चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मा. मनोज रघुवंशी उपस्थित होते.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.एन. डी. चौधरी यांनी अभिरूप न्यायालयाचे महत्व कायदा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच मानव अधिकार दिनानिमित्त
अभिरूप न्यायालयाच्या माध्यमातून विद्यापीठामार्फत मानव अधिकाराची जागृती केली जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मा. न्या. व्ही एन मोरे यांनी उद्घाटनपर मनोगतात अभिरूप न्यायालयातून वकिली कौशल्य विकासित होते हे पटवून दिले. अभिरूप न्यायालय स्पर्धेत मूल्यांकनाचे काम हे न्या.ए.आर. कुलकर्णी व मा. न्या.एस बी मोरे यांनी केले. स्पर्धेत एस एस मणियार विधी महाविद्यालय, जळगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीचे विधी महाविद्यालय, धुळे, एस एम बियानी विधी महाविद्यालय, धुळे, जामिया विधी महाविद्यालय अक्कलकुवा व नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मा. न्यायमूर्तींनी केलेल्या मूल्यांकनानुसार धुळे येथील एस एम बियाणी विधी महाविद्यालयास, प्रथम पारितोषिक, व धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीचे विधी महाविद्यालयास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. अभिरूप न्यायालय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट मूटर म्हणून काझी इद्रिस साजिद
या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय धुळे येथील विद्यार्थ्याला देण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट मेमोरियल हे पारितोषिक समीर कागजी या एन.टी.व्ही.एस विधी महाविद्यालय नंदुरबार येथील विद्यार्थ्यास देण्यात आले. प्रथम पारितोषिक मिळालेल्या महाविद्यालयास विद्यापीठाचे फिरते चषक, स्मृतीचिन्ह व दोन हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. द्वितीय पारितोषिक मिळालेल्या महाविद्यालयास स्मृतीचिन्ह व एक हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. सर्वोत्कृष्ट मूटर व सर्वोत्कृष्ट मेमोरियल मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील स्मृतीचिन्ह व प्रत्येकी पाचशे रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.
सदर कार्यक्रमात १६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अभिरूप न्यायालय स्पर्धेचे संयोजन व समन्वय विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आशा तिवारी यांनी केले. कार्यक्रमात जिल्हा प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, विद्यापीठ अंतर्गत विविध विधी महाविद्यालयातील विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.