नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, बबन काकडे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.