नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या  शिर्षकाअंतर्गत ‘बियाणे’ या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  या सुविधेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यास 20 मे 2021 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे असे, कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी कळविले आहे.