नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यमक्रम पुढीलप्रमाणे आहे-
शुक्रवार 30 एप्रिल 2021 रोजी मुंबई येथून दुपारी 1 वाजता नंदुरबारकडे प्रयाण व नंदुरबार येथे मुक्काम. शनिवार 1 मे 2021 रोजी सकाळी 7.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारकडे प्रयाण. सकाळी 8.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिन समारंभास उपस्थिती व त्यानंतर राखीव.