नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी आदी उपस्थित होते. कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

पालकमंत्री पाडवी यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.