नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक 17 एप्रिल 2021 रोजी होणार असून राज्याच्या इतर भागात असलेल्या पंढरपूर मतदारसंघातील मतदारांना मतदान करता यावे यासाठी 16 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 18 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रवास करण्यास अनुमती देण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिल्या आहेत.

 राज्यातील इतर भागातील  पंढरपूर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेले आणि वैध मतदान फोटो ओळखपत्र  असलेले मतदार  कोणत्याही वाहनाने मतदारसंघात आणि मतदारसंघातून नियेाजित ठिकाणी  प्रवास करू शकेल. सदर व्यक्तीस प्रवास करताना शासनाच्या  ‘ब्रेक द चेन’ आदेशात नमूद सुचनांचे पालन करावे लागेल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.