नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या वित्त विभागांमार्फत सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र,महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था, केंद्र नाशिक यांच्यावतीने लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र क्रमांक 101 चे  50 दिवसांचे प्रशिक्षणसत्र 5 जून 2023  ते 12 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी भि.पां.महाले यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये  दिली आहे.

            24 जून 2015 शासन निर्णयानुसार वर्ग तीन राज्य शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी शासकीय सेवेत प्रवेश करतेवेळी पदस्थापनेपूर्वी  किंवा पदस्थापनेनंतर 6 महिन्यात पायाभूत प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. परंतू  कर्मचाऱ्यास पूर्णवेळ प्रशिक्षणास पाठविणे शक्य नसल्यास विशिष्ट मोड्यूलसाठी प्रवेश घेण्याची अनुमती दिली जाईल. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील प्रशिक्षणास इच्छुक असलेल्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे अर्ज 19 मे 2023 पर्यंत  सहसंचालक, लेखा व कोषागारे,नाशिक विभाग, वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था, केंद्र नाशिक, लेखा कोष भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. महाले यांनी केले आहे.