नंदुरबार (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा दिनांक 6 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले सभागृह, विद्या परिषद पुणे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा । २०२३-२४ चा पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे सहसंचालक डॉ.शोभा खंदारे यांचे अध्यक्षतेत हा सोहळा घेण्यात आला
राज्यभरात शिक्षण विभागात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षक व पर्यवेक्षकिय यंत्रणेसाठी पाच गटात हा उपक्रम राबविला जातो. राज्यभरातून एकूण ८११ स्पर्धकांनी या मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धकांचे जिल्हा, विभागस्तरीय स्पर्धेनंतर राज्यस्तरीय सादरीकरण दिनांक ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात आले.
आपल्या नंदुरबार जिल्हाने तीन गटात बाजी मारली जिल्ह्यातून गट क्र.१ पूर्व प्राथमिक स्तरातून प्रथम क्रमांक बबिता पाडवी ( नंदुरबार)
गट क्र. ३ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून पाचवा क्रमांक भारती मराठे (नंदुरबार),
गट क्र.५ पर्यवेक्षीय अधिकारी गटातून द्वितीय क्रमांक डॉ वनमाला महारु पवार अधिव्याख्याता डायट नंदुरबार (नंदुरबार) .
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा . प्रविण चव्हाण साहेब तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी मा . प्रवीण अहिरे साहेब प्राथमिक शिक्षणाधिकारी मा . सतीश चौधरी साहेब जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांनी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले . जिल्हातील नवोपक्रम स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना डॉ वनमाला पवार व डायट मधील सर्व अधिकारी यांनी मार्गदर्शन केले होते