नंदुरबार (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी बेघरांसोबत दिवाळी साजरी केलेली आहे. नगरपरिषदेच्या आधार बेघर निवाऱ्यातील ज्येष्ठांना शाल, कपडे व मिष्ठान्न वाटप करून त्यांच्या सोबत फटाके फोडून अनोख्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला.

दिवाळी सण म्हटला म्हणजे सगळीकडे चैतन्याचे वातावरण असते. जो तो आपल्या परीने सण-उत्सव साजरे करीत असतो. परंतु गोरगरीब, वंचितांसोबत दिवाळी साजरा करण्याच्या आनंद काही औरच असतो. शहरात सर्वत्र धामधुमीत दिवाळी साजरी होत असतांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी सामाजिक दातृत्व निभावत दीनदयाल योजनेच्या राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत असलेल्या पालिकेच्या आधार बेघर निवाऱ्यातील बेघरांसोबत दिवाळी सण साजरा करून बेघरांच्या आनंद द्विगुणित केला.

याप्रसंगी बेघर जेष्ठांना हिवाळ्याच्या थंडीपासून बचावासाठी शाल, नवीन कपडे व मिष्ठान्न वाटप करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,बेघर निवार्‍याचे व्यवस्थापक शर्मा आदी उपस्थित होते.