नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार 10 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता साक्री येथून मोटारीने नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 12 ते 12.45 वाजता नंदुरबार येथे आगमन व नंदुरबार जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक. 12.45 ते 1.30 वाजेपर्यंत राखीव.
दुपारी 1.30 ते 2.15 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती. 2.15 ते 2.45 नंदुरबार विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, 2.45 ते 3.30 अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, 3.30 ते 4.15 शहादा विधानसभा मतदारसंघ आढवा बैठक, 4.15 ते 5 नवापूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता नंदुरबार येथून शिंदखेडाकडे प्रयाण.