नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  सन 2021-2021 या आर्थिक वर्षांसाठी कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पिक  अंतर्गत सुक्ष्म सिंचन घटकाकरिता तुषार सिंचन व ठिंबक सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत क्षेत्र विस्तार, फलोत्पादन यांत्रिकीकरण, संरक्षीत शेती, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, पॅक हाऊस, कांदाचाळ अशा विविध योजनेसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.