नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : चौथ्यां खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन 5 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हरियाणा येथे होणार आहे. यास्पर्धेसाठी महाराष्ट्रातील खो-खो, कबड्डी व बास्केटबॉल हे खेळ पात्र ठरले असून 18 वर्ष वयोगटातील मुले व मुलीची राज्य संघ निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर निवड चाचणीचे 22 नोव्हेंबर 2021 रोजी आयेाजन करण्यात आले आहे.
कबड्डी व खो-खो खेळासाठी यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे तर बास्केटबॉल खेळासाठी जी.टी.पाटील महाविद्यालय,नंदुरबार येथे सकाळी 9.30 वाजता निवड चाचणी होईल.
राज्य संघ निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी पात्रता अशी, कबड्डी खेळासाठी वजन गट मुले 70 किलो व मुलीसाठी 65 किलो असेल.खेळाडूचा जन्म हा 1 जानेवारी 2003 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. खेळाडूकडे आधारकार्ड, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, जन्मप्रमाणपत्र (5 वर्षांपुर्वी काढलेले ) यापैकी कोणतेही दोन कागदपत्र असणे आवश्यक असेल.या निवड चाचणीत शाळा, क्लबच्या संघांना प्रवेश देण्यात येईल. तर शाळाबाह्य तसेच संघातुन सहभागी होवू न शकणाऱ्या खेळाडूंना निवड चाचणीसाठी संधी देण्यात येईल. स्पर्धा व चाचणी त्या त्या खेळाच्या अधिकृत संघटनेच्या नियमानुसार घेण्यात येईल. निवड चाचणीचे आयोजन खेलो इंडिया युथ गेम्ससाठी राज्य संघ निवड करण्यासाठी करण्यात येत असल्यामुळे यासाठी कोणतेही प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक, जगदीश चौधरी ( 9422834187 ) यांच्याशी संपर्क साधावा. राज्य संघ निवड करण्यासाठी जिल्हा निवड चाचणीत जिल्ह्यातील शाळा,कनिष्ट महाविद्यालय, क्रीडा मंडळे यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.