नंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील नंदुरबार तालुका विधायक समितीच्या ग. तु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी भौतिकशास्त्र विषयाचे जेष्ठ प्राध्यापक निलेश जमनादास सोमाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार शहरातील सर्वात जुन्या अश्या ग. तू. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात भौतिक शास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून जेष्ठ प्रा. निलेश जमनादास सोमाणी हे
32 वर्षांपासून कार्यरत आहेत. मितभाषी व अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणून त्यांची समाजात व शैक्षणिक क्षेत्रात ओळख आहे. प्रा. एन. जे. सोमाणी यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल नं. ता. वि. समितीचे अध्यक्ष श्री. मनोज रघुवंशी, संस्थेचे उपाध्यक्ष माजी ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ऍड. राजेंद्र रघुवंशी व संस्थेचे संचालक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. सोमाणी यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ. आर. आर. कासार, मावळते उपप्राचार्य प्रा. ए. के. शेवाळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी नं. ता. वि. समितीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रा. सोमाणी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.