नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा महिला व बाल विकास विभाग नंदुरबार अंतर्गत जिल्हा बाल कक्षामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा येथे गाव बाल संरक्षण समितीची कार्यशाळा सहायक प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
कार्यशाळेत बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी धडगाव, तळोदा व अक्कलकुवा या तीन तालुक्यातील 64 शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक तसेच कर्मचाऱ्यांना फोस्टर कोअर, दत्तक विधान प्रक्रिया, चाईल्ड लाईन याबाबत मार्गदर्शन केले.
बाल संरक्षण अधिकारी रेणुका मोघे यांनी बालकांचे हक्क, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, बाल कामगार व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण याबाबत माहिती दिली
कार्यशाळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, सहायक प्रकल्प अधिकारी मनिषा सोळंकी, संजय चौधरी उपस्थित होते.