नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयातर्फे राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठींसाठी) 2021 साठी प्रस्ताव 21 जून 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावयाचे आहेत.
विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची किंवा व्यक्तीची शिफारस न घेता केंद्र शासनास [email protected] किंवा [email protected] या मेलवर सादर करावे. पुरस्कारची माहिती, नियमावली व विहीत नमुना https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहीत कालावधीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव किंवा अपूर्ण प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.