नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : पोलिस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सन 2020-2021 योजनेंतर्गत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्य पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी निवड चाचणी बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता पोलिस परेड ग्राउंड नंदुरबार येथे होणार आहे.
सदर प्रशिक्षणासाठी अल्पसंख्याक समाजातील उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे. पात्रतेचे इतर निकष पूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच असतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.