नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील नागरिकांच्या वाहनांचे कच्चे व पक्के अनुज्ञप्ती कामकाजासाठी माहे जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये तालुकास्तरावर मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जानेवारी, 2022  महिन्यात शहादा येथे 11,18 व 25जानेवारी, नवापूर  येथे 5 व 19 जानेवारी , अक्राणी-धडगाव 27 व 28  जानेवारी तर तळोदा येथे 7 व 21 जानेवारी रोजी मासिक दौरा आयोजित करण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात शहादा येथे 8,15 व 22 फेब्रुवारी रोजी, नवापूर येथे 2 व 23 फेब्रुवारी, तळोदा 4 व 18 फेब्रुवारी तर अक्राणी- धडगाव 24 व 25 फेब्रुवारी रोजी दौरा असेल. मार्च महिन्यात शहादा येथे 15,22 व 29 मार्च रोजी, नवापूर येथे 2 व 23 मार्च, तळोदा 4 व 25 मार्च तर अक्राणी- धडगाव 30 व 31 मार्च रोजी मासिक दौरा असेल.

एप्रिल महिन्यात शहादा येथे 12, 19 व 26 एप्रिल रोजी, नवापूर येथे 6 व 27 एप्रिल, तळोदा 1 व 22 एप्रिल तर अक्राणी- धडगाव 28 व 29 एप्रिल रोजी दौरा असेल. मे महिन्यात शहादा येथे 10,17 व 24 मे रोजी, नवापूर येथे 4 व 25 मे , तळोदा 6 व 27 मे तर अक्राणी- धडगाव 30 व 31 मे रोजी मासिक दौरा असेल.

जून महिन्यात शहादा येथे 14,21 व 28 जून रोजी, नवापूर येथे 1 व 22 जून, तळोदा 3 व 24 जून तर अक्राणी- धडगाव 29 व 30 जून रोजी दौरा असेल. जुलै महिन्यात शहादा येथे 12,19 व 26 जुलै रोजी, नवापूर येथे 6 व 27 जुलै, तळोदा 1 व 22 जुलै तर अक्राणी- धडगाव 28 व 29 जुलै रोजी मासिक दौरा असेल.

ऑगस्ट महिन्यात शहादा येथे 8,17 व 23 ऑगस्ट रोजी, नवापूर येथे 3 व 24 ऑगस्ट, तळोदा 5 व 25 ऑगस्ट तर अक्राणी- धडगाव 29 व 30 ऑगस्ट रोजी मासिक दौरा असेल. सप्टेंबर महिन्यात शहादा येथे 13,20 व 27 सप्टेंबर रोजी, नवापूर येथे 7 व 28 सप्टेंबर, तळोदा 2 व 23 सप्टेंबर तर अक्राणी- धडगाव 29 व 30 सप्टेंबर रोजी मासिक दौरा असेल.

ऑक्टोंबर महिन्यात शहादा येथे 11,18 व 25 ऑक्टोंबर रोजी, नवापूर येथे 12 व 19 ऑक्टोंबर, तळोदा 7 व 21 ऑक्टोंबर तर अक्राणी- धडगाव 27 व 28 ऑक्टोंबर रोजी मासिक दौरा असेल. नोव्हेंबर महिन्यात शहादा येथे 7,15 व 22 नोव्हेंबर रोजी नवापूर येथे 2 व 23 नोव्हेंबर, तळोदा 4 व 25 नोव्हेंबर तर अक्राणी- धडगाव 29 व 30 नोव्हेंबर रोजी मासिक दौरा असेल. तर डिसेंबर  महिन्यामध्ये शहादा येथे 13,20 व 27 डिसेंबर रोजी, नवापूर येथे 7 व 28  डिसेंबर, तळोदा 2 व 23 डिसेंबर तर अक्राणी- धडगाव 29 व 30 डिसेंबर रोजी मासिक दौरा राहील.

कच्ची व पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी ही त्या तालुक्यातील लोकांसाठी निश्चित केलेल्या संख्येप्रमाणे घेण्यात येणार आहे. यावेळी अपूर्ण अर्ज स्विकारण्यात येणार नाही. ऐनवेळी एखाद्या तारखेस सुट्टी जाहीर झाल्यास सदर दौरा दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल. कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाचणी वेळी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.

            तरी सर्व मोटार वाहन मालक, चालक व अनुज्ञप्ती धारकांनी कच्ची व पक्की अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन वेळ घेऊन मासिक दौऱ्याच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले आहे.