मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त व्याख्यानमाला
नंदुरबार (प्रतिनिधी):- मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त नंदुरबार डाएट व जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे तज्ञ वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या व्याख्यानमालेचे सर्व मराठी प्रेमी नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डाएट व शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.मराठी भाषेच्या वापरासंदर्भात शासकीय कार्यालयाबरोबर शैक्षणिक संस्थाचा सहभाग वाढावा म्हणुन दरवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ दिनांक 14 जानेवारी 28 जानेवारी या कालावधीत साजरा करणेबाबत निर्देशित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार, जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/ माध्यमिक) च्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मराठी भाषाप्रेमी नागरिकांसाठी दिनांक 27 व 28 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन...
Read More