Month: April 2020

केसरानंद समूहातर्फे दिव्यांगांना मदत मेथी गटातील गावांत साहित्य वाटप

दोंडाईचा : (प्रतिनिधी):- संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा आपल्या देशात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिंदखेडा तालुक्यातील अश्याच दिव्यांग बांधवांना मदत देण्यात आली. लॉक डाऊनमुळे देशात अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. याची जाणीव ठेवत या परिस्थितीत थोडा का होईना दिव्यांग बांधवांना दिलासा मिळावा म्हणून दोंडाईचा येथील केशरानंद उद्योग समुहातर्फे मेथी गटाचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांच्यावतीने मालपुर, करले, परसोळे या गावातील गरजू दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य दगाजी देवरे, करले गावाचे सरपंच साहेबराव पवार, चंद्रकांत पाटील, प्रशांत बोरसे, शिवराम सोनवणे, आदी उपस्थित...

Read More

प्रधानमंत्री सहायता कोषासाठी डॉ. हिनाताई गवितांचे एक कोटी

नंदुरबार (प्रतिनिधी):- नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी आपल्या खासदार स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांची रक्कम प्रधानमंत्री सहाय्यता निधी खात्यामध्ये वर्ग करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना दिलेल्या पत्रात केल्या आहेत. कोविड 19 अर्थातच कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव जगभर पसरल्यामुळे जागतिक महामारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही या रोगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासदारांना प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये मदत करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी खासदार स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये रक्कम प्रधानमंत्री सहाय्यता कोषामध्ये वर्ग करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्याचबरोबर आपल्या मासिक वेतनातून एक लक्ष रुपये एवढी रक्कम प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वडील माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित हेही उपस्थित होते. देशावर ओढवलेल्या संकटाच्या काळात त्यांनी केलेली मदत नाककुच उपयुक्त ठरणार...

Read More

जिल्हा परिषद इमारतीचेही निर्जंतुकीकरण जिप मुकाअ श्री विनय गौडांच्या नेतृत्वात यंत्रणा कार्यरत

नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोना (कोविड 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांच्या आदेशानुसार जिल्हाभर शासकीय व सार्वजनिक इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच नंदुरबार जिल्हा परिषद इमारतीचेही निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी नुकतेच जिल्हाभरातील शाळा, ग्रामपंचायत यासह सर्व शासकीय निमशासकीय व सार्वजनिक इमारती औषधांची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात औषध फवारणीचे काम हाती घेण्यात आले. त्याबरोबरच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीतही सोडियम हायपोक्लोराईड या रासायनिक द्रव्याची फवारणी करण्यात आली. जिल्हा परिषद इमारतीच्या कानाकोपऱ्यात ही फवारणी करण्यात आली असून, जिल्हा परिषद पदाधिकारी निवास, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत या भागातही निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यात आली आहे. कोविड 19 म्हणजेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबरोबरच विविध उपाययोजना राबवून प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेखर रौदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) श्री भुपेंद्र बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पापु व स्व. तसेच महिला बालकल्याण) डॉ. वर्षा फडोळ बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( रोहयो) व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री अनिकेत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्री. नितीन बोडके, शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री मच्छिंद्र कदम, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री. भानुदास रोकडे, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. एन. एल. बावा, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री डी. एच. चौधरी, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदिप लाटे,...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!