Month: March 2020

जिल्ह्यातील नागरिकांसाठी घरपोच स्वस्त धान्य जिप मुकाअ श्री विनय गौडा यांच्या हस्ते वाटप प्रांताधिकारी श्रीमती पंत व तहसीलदार थोरात यांची उपस्थिती

नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्याने नागरिकांना सुविधा म्हणून घरपोच स्वस्त दरातील धान्य योजनेंतर्गत साहित्य वाटप केले जात असून, तालुक्यातील कोठली खुर्द येथे या योजनेंतर्गत साहित्य वाटपाला सुरुवात करण्यात आली. सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा व प्रांताधिकारी श्रीमती वसुमना पंत यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली असून, या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने शहरी भागासह ग्रामीण भागाच्या जनतेला घरपोच धान्य वितरण योजनेंतर्गत गहू, साखर, डाळ-तांदूळ या जिवनावश्यक साहित्यासह भाजीपाल्याचे वाटप करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने व लोकसहभागातून नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द गावात अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करत गावातील सुमारे अकराशे लाभार्थ्यांना 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू व 20 रुपये किलो साखर या दराने एका व्यक्तीस 15 किलो तांदूळ, 10 किलो गहू व 1 किलो साखर सोबतच गावातील समाजसेवी व्यक्तींकडून प्राप्त भाजीपाला टमाटे, कारले, मका अशा साहित्याचे 1100 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा, प्रांताधिकारी श्रीमती वसुमना पंत, तसेच सर्वश्री तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश वळवी, तालुका आरोग्य अधिकारी जे. आर. तडवी, पंचायत समिती सदस्य दिनेश वळवी, ग्रामपंचायत सदस्य विलास शेगजी वळवी, बालाजी संजय वळवी, ग्रामसेवक आर. डी. पवार, पोलीस पाटील प्रल्‍हाद जगन्नाथ पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार...

Read More

शाळेतले दाळ तांदूळ विद्यार्थ्यांना वाटप करा नंदुरबार जिपचे मुकाअ श्री विनय गौडा यांचे आदेश

नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडावून असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्या अनुषंगाने शालेय पोषण आहार योजना सुरू असलेल्या विविध शाळांमध्ये पडून असलेला दाळ तांदूळ या धान्यादी मालाचा साठा शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी याबाबतचे आदेश नुकतेच पारित केले आहेत. संपूर्ण देशात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर साथ रोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत 15 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुमोटो रिट याचिकेद्वारे विविध शाळांमध्ये पडून असलेले धान्यादी साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शासनाने शालेय पोषण आहार योजनेचे तांदूळ व डाळी हे साहित्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजना सुरू असलेल्या सर्व शाळांमध्येही मार्च व एप्रिल महिन्याचे शालेय पोषण आहार योजनेचे दाळ व तांदूळ हे साहित्य पडून आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, शाळेत शिल्लक असलेल्या तांदूळ व विविध डाळींचे विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याबाबत मुख्याध्यापक, शाळेतील शालेय पोषण आहार योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने समन्वयाने कार्यवाही करावी, साहित्य वाटप करण्यापूर्वी या योजनेला आपल्या गावात व्यापक प्रमाणात प्रसिद्धी द्यावी, साहित्य वाटप करताना गर्दी करू नये, ग्रामस्थांना रांगेत उभे करून त्यांच्यामध्ये एक मीटर अंतर ठेवण्यात यावे, एखादा विद्यार्थी व त्यांचे पालक आजारी असतील तर त्यांना हे साहित्य घरपोच वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे, तसेच या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व शासनाने कलम 144 अन्वये...

Read More

अनाथांचे नाथ अस्तित्व फाऊंडेशन

नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागु करण्यात आलेल्या 21 दिवासांच्या लॉक डाऊन दरम्यान बेघर, हातवरचे मजुर कामगार आणि रस्तावरचे अनाथांचे नाथ होण्यासाठी अनेक सामाजीक संस्था सरसावल्या असुन त्या विविध प्रकारे मदतीच हात देत आहेत. अशातलीच एक संस्था ही अस्तित्व फाऊडेशन असुन ती नंदुरबार शहरातील भुकेल्या आणि तहानलेल्याच्या पोटाला आधार देण्याचे काम करत आहे. विविध समाजाच्या चार मित्रांनी येवुन तयार केलेली फाऊडेशन काही महिलांच्या माध्यमातुन रोज अडीचशे ते तीनशे लोकांचे अन्न शिजवुन त्याचे शहरातील विविध ठिकाणी वाटप करत आहे. शहरातील एकही गरजु भुका राहुनये असा या अस्तित्व फाऊडेशनच्या सदस्यांचा मानस असुन यासाठी ते शहरातील अनेक दाणशुरांची देखील मदत घेत आहेत. जो पर्यत करोणा महामाही संकटामुळे ही परिस्थीती राहील तो पर्यत अस्तित्व फाऊडेशन मार्फत दिला जाणारा मदतीचा हात कायम अविरत सुरु ठेवण्याचा मानस देखील या फाऊडेशनने व्यक्त केला आहे. या उपक्रमाचे सध्या सर्वच स्तरावरुन कौतुक होतांना देखील दिसुन येत...

Read More

कलाविष्कार कडून नंदुरबारात चित्रकला स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी संधी

नंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील कलाविष्कार प्रतिष्ठाण तर्फे कोविड-19(कोरोना) आजाराबाबत जनजागृती होण्यासाठी इ.१ ली ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क चिञकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोरोनो व्हायरसमुळे सर्व विद्यार्थ्यांना शाळेला सुट्या आहेत. या सुट्टीत विद्यार्थी दिवसभर घरात टि.व्ही., मोबाईल तसेच कॉम्प्युटर समोर बसलेले असतात. त्यामुळे डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व सुट्टीचा सदुपयोग होण्यासाठी कलाविष्कार प्रतिष्ठाणतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत पालक बंधु भगिणींनी घरात बसुनच मुलांकडुन चिञ काढुन घ्यावयाचे आहे. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फोनवरून संपर्क साधावा व त्यांना घराबाहेर न फिरण्याची सुचना द्यावी. या चिञकला स्पर्धेची वैशिष्ट्ये अशी, दिनांक 10 एप्रिल शुक्रवार 2020 पर्यंत चिञाचा फोटो पाठविणे. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना रंगीत सहभाग प्रमाणपञ व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येईल, स्पर्धा निःशुल्क आहे, आपल्या स्वतःच्या चिञकला वहिवर किंवा जो पांढरा कागद उपलब्ध असेल त्यावर चिञ काढणे.(चिञाच्या आकाराचे बंधन नाही.), चिञ कोणत्याही रंग माध्यमातून रंगवु शकतात, स्पर्धा हि दोन गटात असेल( इ.1ली ते 4 थी) व (इ.5 वी ते 10 वी), स्पर्धेचा निकाल व बक्षिस समारंभाबाबत मोबाईल वर कळविण्यात येईल, स्पर्धेत (मराठी, इंग्रजी, ऊर्दू, गुजराथी, हिंदी) माध्यमांमधिल शाळेतील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात, अपुर्ण चिञ स्पर्धेत स्विकारले जाणार नाही, चिञाखाली एका बाजुला दिसेल व समजेल अशा स्वरूपात (मराठीत) स्वतःचे पुर्ण नाव, शाळेचे पुर्ण नाव, इयत्ता, तुकडी, मोबाईल नंबर सुंदर अक्षरात लिहावा, चिञाचा विषय- कोरोना (कोविड-19) आजार जनजागृती, चिञाचा चांगला काढलेला एकच फोटो आयोजकांच्या खालील दिलेल्या व्हाट्स...

Read More

आयसोलेशन वार्ड साठी माजी आमदारांनी दिले आपले निवासस्थान

अमळनेर (प्रतिनिधी):-: येथील माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपलें अमळनेर येथील निवासस्थान कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसोलेशन वार्ड म्हणून वापरण्याची मुभा देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अमळनेर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढन्याची शक्यता असून पुढे पुढे दवाखानेही कमी पडतील. ही कमतरता भासू नये म्हणून माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपलें स्टेशन रोडवरील इंदुमाई निवास हे शासनाला आयसोलेशन वॉर्ड म्हणून वापरण्याची लेखी परवानगी दिली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी अमळनेरच्या प्रांतअधिकारी श्रीमती सीमा अहिरे यांच्याकडे दिले आहे. अश्या प्रकारे शिरीषदादा चौधरी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत एकप्रकारे सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना व्यक्त होत...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!