Month: March 2020

‘करोना’ नियंत्रणासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये-डॉ.राजेंद्र भारूड

नंदुरबार (प्रतिनिधी) :- करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानूसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 च्या कलम 144 नुसार जिल्ह्यात सोमवार 23 मार्च 2020 मध्यरात्रीपासून 31 मार्च 2020 पर्यंत मनाई आदेश दिले आहेत. या कालावधीत जिल्ह्याच्या सर्व सीमा येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी बंद करण्यात येतील. कोणत्याही खाजगी वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही. केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेशी संबंधीत वाहनांना फिरण्यास अनुमती असेल. जिल्ह्यातील नागरीकांनी केवळ वैद्यकीय कारणासाठी किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्यास अनुमती असेल. पोलिसांनी विचारणा केल्यावर योग्य कारण सांगावे लागेल व त्याचा पुरावा सोबत ठेवावा लागेल. अन्यथा कारवाई करण्यात येईल. अशा योग्य कारणांसाठी बाहेर पडल्यानंरही नागरिकांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास अनुमती असणार नाही. अशा अत्यावश्यक कामासाठी जाताना टॅक्सी किंवा खाजगी वाहनात चालक आणि इतर दोन व्यक्तींना अनुमती असेल, तर रिक्शाचा उपयोग करताना चालक आणि एका व्यक्तीस अनुमती असेल. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी प्रवाशांच्या वाहतूकीला अनुमती असेल. सामान्य कामकाजासाठी ही अनुमती असणार नाही. जिल्ह्यात बाहेरील राज्याच्या बसेस किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची वाहतूक बंद असणार आहे. बँक, विमा, एटीएम, मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे, पोस्ट आणि इंटरनेट सेवा, जीवनावश्यक वस्तूंसाठी ई-कॉमर्स, खाद्य पदार्थांची घरपोच सेवा, जीवनावश्यक वस्तू, रुग्णालये, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, खाजगी सुरक्षा सेवा, करोना नियंत्रणासाठी सहकार्य करणाऱ्या आस्थापना, औषधे, दूध, बेकरी, अन्नधान्य, कृषी निविष्ठा, पशूखाद्य, पशूंचे दवाखान्यांशी संबंधित आस्थापना व वाहतूक सुरू राहील....

Read More

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठ्यात अडथळा नको मध्यरात्रीपासून कलम 144 लागू होणार – डॉ.राजेंद्र भारुड

‘करोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यातदेखील याची अंमलबजावणी करण्यात येणार असून या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील, त्यात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. सोमवारी पहाटे पर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्यास अनुमती रहाणार नाही. त्यानंतरदेखील गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यात शहरी भागात 144 कलम लागू करण्यात येणार असून 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही. नागरिकांनी एकत्र फिरू नये किंवा एकाच ठिकाणी गर्दी करू नये. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची सेवा आणि बँका सुरू राहतील. बाहेरील वाहनांना जिल्ह्यात प्रवेश असणार नाही. अशावेळी संबंअधित अधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांच्या संपर्कात राहून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल याचे नियोजन करावे. नागरिकांना आवश्यक वस्तू योग्यप्रकारे मिळतील याकडेदेखील विशेष लक्ष देण्यात यावे.नागरिकांनी ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान चांगले सहकार्य केले आहे. विषाणूचा धोका कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आणखी काही दिवस गर्दी टाळावी लागणार आहे. त्यासाठी नागरिकांनी 23 मार्चपर्यंत बाहेर रस्त्यावर येऊ नये. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी नेहमीची पूजाअर्चा सुरू राहील, मात्र त्या ठिकाणी नागरिकांना एकत्र येऊ नये. पुढील सुचनेपर्यंत कोणतेही बाजार भरविण्यात येऊ नये. वाहतूक सेवा पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून अथवा परदेशातून आलेल्या नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. ज्या नागरिकांना ‘क्वारंटाईन’ करण्यास सांगितले आहे त्यांनी इतरांपासून स्वत:ला...

Read More

नंदुरबार जिल्ह्यात पान टपऱ्या बंद जिल्हाधिकारी डॉ भारुड यांचे आदेश

नंदुरबार (प्रतिनिधी):- महाराष्ट्रात कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून 31 मार्च पर्यंत नांदूरबारात पान दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. कोरोना या विषाणूची लागण झालेल्या इतर भागातून तसेच देशातून अनेक नागरिक प्रवास करुन येत आहेत. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना या विषाणूचा संसर्ग हा खोकला,थूंकी याद्वारे होण्याची शक्यता आहे. पान, गुटखा अथवा त्यासारखे पदार्थ खाऊन नागरिक स्वैरपणे सार्वजनिक ठिकाणी थूंकत असतात. त्यामुळे या विषाणूंचा त्याद्वारे संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील ​पान, गुटखा व यासारख्या पदार्थांची विक्री जेथून होते अशी दुकाने, पान टपरी, पान ठेले 31 मार्च पर्यंत पूर्णत: बंद ठेवण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. ..तर 5000 दंड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबधीत पानटपरी, पानठेला यांना शिक्का मारुन सिल करावे व त्याची चावी संबधीत मालकाकडे सुर्पूद करावी. जर पानटपरी, पानठेला याचे सिल तुटलेले आढळले किंवा पानटपरी उघडी असल्याचे निर्देशनास आल्यास संबंधीताकडून 5000 रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता 1860(45) च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी...

Read More

नंदुरबार जिल्हा परिषद इमारत लॉकडाऊन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांची कार्यवाही

नंदुरबार (प्रतिनिधी) :- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या नागरिकांची व जिल्हा परिषद इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून, जिल्हा परिषद इमारत लॉकडाऊन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांनी याबाबत निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केली आहे. जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी अस्तित्वात असते. याठिकाणी जिल्हाभरातून नागरिक आपली विविध कामे घेऊन नियमित येत असतात. त्यामुळे जिल्हा परिषद इमारतीत मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखणे महत्त्वाचे मानले जात असून, त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी जिल्हा परिषद इमारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा परिषदेमध्ये अपरिहार्य कारणाशिवाय प्रवेश करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अभ्यागतांना महत्त्वाच्या कारणाची नोंदणी केल्यानंतरच इमारतीमध्ये प्रवेश दिला जात आहे. इमारतीमध्ये पोहोचेपर्यंत दोन ठिकाणी प्रत्येकाची चौकशी केली जात असून, महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जात नाही. नागरिकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडे अत्यंत महत्वाचे काम असल्यास वा काही निवेदन द्यायचे असल्यास ईमेल द्वारे [email protected] या ईमेल आयडीवर किंवा 02564- 210224, 210241 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी प्रत्यक्ष म्हणणे मांडणे आवश्यक असेल तरच सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान कार्यालयात यावे, आशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या 25 टक्क्यांवर...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!