अमळनेर (प्रतिनिधी):-: येथील माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपलें अमळनेर येथील निवासस्थान कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसोलेशन वार्ड म्हणून वापरण्याची मुभा देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
अमळनेर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढन्याची शक्यता असून पुढे पुढे दवाखानेही कमी पडतील. ही कमतरता भासू नये म्हणून माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपलें स्टेशन रोडवरील इंदुमाई निवास हे शासनाला आयसोलेशन वॉर्ड म्हणून वापरण्याची लेखी परवानगी दिली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी अमळनेरच्या प्रांतअधिकारी श्रीमती सीमा अहिरे यांच्याकडे दिले आहे. अश्या प्रकारे शिरीषदादा चौधरी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत एकप्रकारे सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना व्यक्त होत आहे.