नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ  के. सी. पाडवी हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे.

शनिवार 10 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक.   दुपारी 12 वाजता जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे बैठक व माझगांव डॉक शिपबिल्डर्स लि. मुंबई यांचे सामाजिक दायित्व निधीतून  प्राप्त झालेल्या 11 रुग्णवाहीका व 2 शववाहीका यांचे लोकार्पण सोहळा.  दुपारी 12.45 वाजता रामपूर ता. अक्कलकुवा येथील धरण प्रकल्पग्रस्तांबाबत जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी व भुसंपादन अधिकारी यांच्यासोबत बैठक.  दुपारी 1.00 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील दुकानदार प्रतिनिधींशी बैठक.  सायंकाळी 5.00 वाजता जिल्हाधिकारी, खाजगी डॉक्टर व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी ऑनलाईन पध्दतीने (व्हीसीद्वारे) बैठक.  सायंकाळी 6.00 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी ऑनलाईन पध्दतीने (व्हीसीद्वारे) बैठक. 

रविवार 11 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता नंदुरबार येथून तळोदा-रापापुर-गौवऱ्यामाळ रस्त्याच्या कामाची पाहणीसाठी प्रयाण.  दुपारी 12.00 वाजता कामाची पाहणी व असलीकडे रवाना.  सायंकाळी 5.00 वाजता असली येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.