नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यासाठी 11 महिनाच्या कालावधीच्या ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ साठी अंतिम छाननी व मुलाखतीअंती 50 उमेदवाराची निवड करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या 1065 उमेदवारापैकी दूरध्वनीवरील समूह चर्चा आणि वैयक्तिक मुलाखती सहभागातून 200 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यातून 113 उमेदवाराची पुढील मुलाखतीसाठी निवड करण्यात आली.  मुलाखती व ग्रुप चर्चेद्वारे  50 उमेदवाराची डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे. 15 उमेदवार प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील 10 उमेदवार,जिल्ह्याव्यतिरिक्त 20 उमेदवार, महाराष्ट्राबाहेरील 20 उमेदवाराची निवड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिपसाठी करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवाराची यादी www.nandurbar.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.