नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनामार्फत राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासाकरिता राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक, युवती व नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थाना प्रदान करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी 26 जूनपर्यंत  प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.

             युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, युवा कल्याण विभागामार्फत सन 2017-18 व सन 2018-19 या दोन वर्षाच्या पुरस्काराकरिता प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. पुरस्काराबाबत अधिक माहिती व अर्ज करीता https://innovate.mygov.in/national-youth-awards-2018https://innovate.mygov.in/national-youth-awards-2019 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

            युवक, युवती व नोंदणीकृत संस्था यांनी  राष्ट्रीय युवा पुरस्काराकरिता आपले प्रस्ताव वरील संकेतस्थळावर 26 जून 2020 पर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, साक्री नाका, खामगाव रोड, नंदुरबार येथे 10 जून 2020 पर्यंत संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.