नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सतत पाच वर्षे भरणा न केल्यामुळे बंद डाक विमा पॉलिसींचे पुनरुज्जीवन करण्याची संधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर या पॉलिसींचे पुनरुज्जीवन करण्यात येणार नाही. यासाठी पॉलिसीधारकाच्या चांगल्या आरोग्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता राहील. पॉलिसीधारकांनी अधिक माहितीसाठी जवळच्या टपाल कार्यालयात किंवा टोल फ्री क्रमांक 18001805232 वर संपर्क साधावा, असे प्रवर अधीक्षक प्रतापराव सोनवणे यांनी कळविले आहे.