Author: Ramchandra Bari

‘प्रति थेंब अधिक पिक’ सुक्ष्म सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – सी.के. ठाकरे

नंदुरबार, दिनांक 19 डिसेंबर 2023 (जिमाका वृत्त) –  राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजनेच्या वर्ष 2023-24 मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी.के. ठाकरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजना वर्ष सन 2023-24 साठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व बहुभूधारकांना 45 टक्के अनुदान देण्यात येते. अनुसुचित जाती व अनुसूचीत जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती योजने 35 टक्के व 45 टक्के पुरक अनुदान देय असल्याने पात्र असलेल्या शेतकऱ्यांना मंजुर मापदंडाच्या 90 टक्के  मर्यादेत अनुदान देण्यात येते.  वर्ष 2023-24 मध्ये जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता रुपये 12 लाख  व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी रुपये 275 लाख 61 हजार निधी शिल्लक आहे. सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या अनु.जाती व अनु.जमाती लाभार्थ्यांचे अर्जाचे प्रमाण कमी असल्याने अर्ज नोंदणीसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.  अर्ज रद्द होणार नाही यासाठी अचुक माहीती भरावी. अर्ज करतांना सातबारा, 8 अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आवश्यक असून आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असावी. नोंद नसल्यास विहीर, शेततळे याबाबत स्वयं घोषणापत्र देण्यात यावे....

Read More

तालुकास्तरावर वाहन परवान्यासाठी दौऱ्याचे आयोजन – किरण बिडकर

नंदुरबार(जिमाका वृत्त) – नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामर्फत जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी कच्चे व पक्के वाहन परवान्यासाठी (अनुज्ञप्ती) सर्व तालुक्याच्या ठिकाणी जावून कामकाज करण्यात येणार असून वर्ष 2024 मध्ये तालुकास्तर मासिक दौऱ्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. जानेवारी 2024 महिन्यात : 9, 16 व 23 शहादा, 4 ,18 नवापूर, 5, 19 तळोदा, 11 अक्कलकुवा, 29 व 30 धडगांव. फेब्रूवारी 2024 महिन्यात: 6, 13 व 20 शहादा, 1 व 22 नवापूर, 9 व 23 तळोदा, 8 अक्कलकुवा, 27 व 28 धडगांव. मार्च 2024 महिन्यात:  5, 12 व 19 शहादा, 7 व 21 नवापूर, 1 व 15 तळोदा, 14 अक्कलकुवा, 26 व 27 धडगांव. एप्रिल 2024 महिन्यात: 2, 16 व 23 शहादा, 4 व 25 नवापूर, 5 व 19 तळोदा, 18 अक्कलकुवा, 29 व 30 धडगांव. मे 2024 महिन्यात : 7, 14 व 21 शहादा, 9 व 30 नवापूर, 3 व 17 तळोदा, 16 अक्कलकुवा, 28 व 29 धडगांव. जून 2024 महिन्यात : 4, 11 व 18 शहादा, 6 व 20 नवापूर, 7 व 21 तळोदा, 13 अक्कलकुवा, 27 व 28 धडगांव. जुलै 2024 महिन्यात : 9, 16 व 23 शहादा, 4 व 25 नवापूर, 5 व 19 तळोदा, 18 अक्कलकुवा, 30 व 31 धडगांव. ऑगस्ट 2024 महिन्यात : 6, 20 व 27 शहादा, 1 व 22 नवापूर, 2 व 16 तळोदा, 8 अक्कलकुवा, 29 व 30 धडगांव. सप्टेंबर 2024 महिन्यात...

Read More

जात पडताळणीतील त्रुटींच्या पुर्ततेसाठी 21 व 22 डिसेंबर रोजी शिबिर – योगेश पाटील

नंदुरबार (जिमाका वृत्त) – जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ज्यांचे जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्रलंबित आहेत, अशा सर्व अर्जदारांना त्रुटींची पुर्तता करण्यासाठी 21 व 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलारोड नंदुरबार येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती योगेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!