नंदुरबार(जिमाका वृत्त) – नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामर्फत जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी कच्चे व पक्के वाहन परवान्यासाठी (अनुज्ञप्ती) सर्व तालुक्याच्या ठिकाणी जावून कामकाज करण्यात येणार असून वर्ष 2024 मध्ये तालुकास्तर मासिक दौऱ्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  • जानेवारी 2024 महिन्यात : 9, 16 व 23 शहादा, 4 ,18 नवापूर, 5, 19 तळोदा, 11 अक्कलकुवा, 29 व 30 धडगांव.
  • फेब्रूवारी 2024 महिन्यात: 6, 13 व 20 शहादा, 1 व 22 नवापूर, 9 व 23 तळोदा, 8 अक्कलकुवा, 27 व 28 धडगांव.
  • मार्च 2024 महिन्यात:  5, 12 व 19 शहादा, 7 व 21 नवापूर, 1 व 15 तळोदा, 14 अक्कलकुवा, 26 व 27 धडगांव.
  • एप्रिल 2024 महिन्यात: 2, 16 व 23 शहादा, 4 व 25 नवापूर, 5 व 19 तळोदा, 18 अक्कलकुवा, 29 व 30 धडगांव.
  • मे 2024 महिन्यात : 7, 14 व 21 शहादा, 9 व 30 नवापूर, 3 व 17 तळोदा, 16 अक्कलकुवा, 28 व 29 धडगांव.
  • जून 2024 महिन्यात : 4, 11 व 18 शहादा, 6 व 20 नवापूर, 7 व 21 तळोदा, 13 अक्कलकुवा, 27 व 28 धडगांव.
  • जुलै 2024 महिन्यात : 9, 16 व 23 शहादा, 4 व 25 नवापूर, 5 व 19 तळोदा, 18 अक्कलकुवा, 30 व 31 धडगांव.
  • ऑगस्ट 2024 महिन्यात : 6, 20 व 27 शहादा, 1 व 22 नवापूर, 2 व 16 तळोदा, 8 अक्कलकुवा, 29 व 30 धडगांव.
  • सप्टेंबर 2024 महिन्यात : 3, 10 व 24 शहादा, 5 व 19 नवापूर, 6 व 20 तळोदा, 12 अक्कलकुवा, 26 व 27 धडगांव.
  • ऑक्टोंबर 2024 महिन्यात: 8, 15 व 22 शहादा, 3 व 17 नवापूर, 4 व 18 तळोदा, 10 अक्कलकुवा, 24 व 25 धडगांव.
  • नोव्हेंबर 2024 महिन्यात : 12, 19 व 26 शहादा, 7 व 21 नवापूर, 8 व 22 तळोदा, 14 अक्कलकुवा,  28 व 29 धडगांव.
  • डिसेंबर 2024 महिन्यात : 10, 17 व 24 शहादा, 5 व 19 नवापूर, 6 व 20 तळोदा, 12 अक्कलकुवा, 26 व 27 धडगांव.

सर्व मोटार वाहन मालक, चालक, संबंधित संघटनेचे प्रतिनिधी व वाहन परवाना  (अनुज्ञप्ती) धारकांनी कच्च्या  व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन वेळ घेऊन मासिक दौऱ्याच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, असेही आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. बिडकर यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.