Author: Ramchandra Bari

कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वच्छाग्रहींचा पुढाकार

नंदुरबार-( प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या लढाईत जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यरत असलेले स्वच्छाग्रही सहभागी झाले असून, स्वच्छाग्रहीमार्फत ग्रामीण भागात स्वच्छ हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक च्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येऊन ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावागावात औषध फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच ग्राम स्तरावर कार्यरत असलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छाग्रही यांच्यामार्फत कोरोना या संसर्ग आजारापासून बचाव होण्यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये मास्क लावणे, हात धुणे, तोंडाला नाकाला रुमाल बांधणे, सामाजिक अंतर राखणे याविषयी जाणीवजागृती करण्यात येत आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छतेविषयक बाबींवर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी व स्वच्छतेविषयक ग्रामपंचायत स्तरावर जाणीव जागृती करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंसेवक म्हणून एक किंवा दोन असे एकूण ११४८ स्वच्छाग्रही नियुक्त करण्यात आले आहेत. या स्वच्छाग्रहीची ग्रामस्तरावरील स्वच्छते विषयक कामांसाठी शासनाला नेहमीच मदत होते. कोरोना विरुद्धच्या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छाग्रहींना सहभागी करून घेणेबाबत राज्यस्तरावरून सूचना प्राप्त होत्या. त्यानुसार पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट संसाधन केंद्राच्या कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छाग्रहींना या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेऊन गावात काम करणेबाबत प्रोत्साहित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्वच्छाग्रहींनी कोरोना विषाणूबाबत ग्रामस्थांच्या...

Read More

मोदींना पाहिजे यासाठी तुमची साथ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशभरात आता ३ मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. याबाबतची मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी केली जाईल. आपल्या देशात करोनाचे ५५० रुग्ण होते, तेव्हाच आपण २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा संकल्प केला. इतर देशांच्या तुलनेत चांगलं काम केल्यामुळेच परिस्थिती अत्यंत नियंत्रणात असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा १४ एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. केंद्र सरकारकडून नवीन लॉकडाऊनसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली जाणार आहे. सर्व वर्गांचा विचार करुन लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशवासियांकडून पंतप्रधान मोदी यांनी सात मुद्द्यांवर साथ मागितली आहे.या सात गोष्टींवर मागितली साथघरातील वृद्धांची विशेष काळजी घ्या, ज्यांना अगोदरच आजार असतील त्यांची आणखी काळजी घ्या. त्यांना करोनापासून वाचवा. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषेचं काटेकोर पालन करा. घरात तयार मास्कचा वापर करा. स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाटी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या गोष्टी करा. करोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेतू मोबाइल अॅप डाऊनलोड करा आणि इतरांनाही याबाबत सांगा. शक्य तेवढं गरीब कुटुंबाची देखरेख करा आणि जेवणाची काळजी घ्या. तुमचा व्यवसाय आणि उद्योगात तुमच्यासोबत काम करत असलेल्या सहकाऱ्यांविषयी सहवेदना ठेवा, त्यांना कामावरुन काढून टाकू नका. देशातील करोना युद्धातील डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, पोलीस या सर्वांचा आदर करा, अशा सात गोष्टींसाठी साथ हवी असल्याचंही मोदी म्हणाले. विजय मिळवण्यासाठी ही सप्तपदी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. १. घरातील ज्येष्ठांची...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!