Author: Ramchandra Bari

आरोग्य विषयक सूचनेसाठी 1921 टोल फ्री क्रमांक

नंदुरबार : नागरिकांना आरोग्य विषयक सूचना देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘आरोग्य सेतू आयव्हीआरएस’ सेवा सुरू करण्यात आली असून दूरध्वनी आणि मोबाईलसाठी 1921 या टोल फ्री क्रमांकाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला  1921 क्रमांकावर मिस कॉल करावयाचा आहे. कॉल बंद झाल्यावर त्यास या सेवेच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येईल. त्यास आरोग्य सेतू ॲपशी संबंधीत आरोग्य विषयक माहिती विचारण्यात येईल. दिलेल्या उत्तराच्या आधारे लघुसंदेशाच्या (एसएमएस) माध्यमातून आपल्या प्रकृतीच्या सद्यस्थिती विषयी माहिती देण्यात येईल.  नंतर देखील नागरिकांना त्यांच्या प्रकृती विषयी संदेश देण्यात येतील. अधिकाधीक नागरिकांना या सेवेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही सेवा 11 भाषांमधून उपलब्ध करून देण्यात आली असून सेवेचा उपयोग करणाऱ्या व्यक्तीस त्याने निवडलेल्या भाषेत एसएमएस येणार आहे. व्यक्तीने दिलेली माहिती ‘आरोग्य सेतू’ शी जोडली जाणार असल्याने नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सूचना प्राप्त होऊ शकतील. अधिकाधीक नागरिकांनी आरोग्य विषयक सुरक्षेसाठी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि इतर कोणत्याही क्रमांकावरून संपर्क साधला गेल्यास माहिती देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले...

Read More

संकटाच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे मुख्यमंत्री सहायता निधीला जिल्ह्यातून 20 लाख रुपये

नंदुरबार : कोविड-19 संसर्गामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी अनेक नागरिक आणि संस्था  मदतीसाठी पुढे सरसावले असून मुख्यमंत्री सहायता निधीला  19 लाख 22 हजार 148 आणि पीएम केअर निधीसाठी 8 लाख 65 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. संकट सुरू झाल्यापासून अनेक व्यक्ती आणि संस्थांनी मदत कार्यात प्रशासनाला सहकार्य केले. भोजन व्यवस्था,  मजूरांना निवारा, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा स्वरुपात मोठ्या प्रमाणात मदत झाली. काहींनी  मास्क,सॅनिटायझर आणि साबणाचे ग्रामीण भागात वाटप केले. संकट मोठे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. वृद्धांपासून सहकारी संस्थांपर्यंत अनेकांनी आपापल्यापरिने योगदान दिले आहे. नागरिकांनी मदत कार्यासाठी पुढे यावे आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19 या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा फोर्ट मुंबई येथे स्वतंत्र बँक खाते असून खाते क्रमांक 39239591720 आहे. शाखा कोड 00300 तर आयएफएससी कोड एसबीआयएन 0000300 आहे. देणगीसाठी आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात...

Read More

गुजरातमधून 676 मजूर आपल्या गावी परतले आदिवासी विकास विभागाचे विशेष प्रयत्न

नंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या प्रयत्नामुळे गुजरात येथे अडकलेले 676 मजूर आपल्या गावी परतले आहेत. याशिवाय राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि पालघर येथून देखील नागरिकांना जिल्ह्यात आणण्यात आले आहे. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या सुचनेनुसार दोन्ही प्रकल्प कार्यालयांनी मजूरांना परत आणण्यासाठी नियोजन केले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाशी आणि जिल्ह्यातील समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क  साधण्यात आला. तिथल्या मजूरांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी शैलेश पाटील, अमोल मटकर, राहूल इधे आणि किरण मोरे या चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. द्वारका येथील 220, पोरबंदर 55, वापी 103, आणंद 37, जामनगर 59, बडोदा 32, गांधीनगर 43, भरूच 102, दमण 25 अशा प्रकारे एकूण 676 मजूरांना परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक सर्व मजूरांच्या जिल्हानिहाय याद्या तयार करून वाहनाची सोय केली.  आदिवासी विभागामार्फत न्यूक्लिअस बजेटच्या माध्यमातून वाहन खर्चाची सुविधा करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे यातील बरेचसे मजूर गावाकडे परतले असून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.  सीमेवर सर्व मजूरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. तसेच या मजूरांच्या भोजनाचीदेखील सोय करण्यात आली.  मजूरांचा रोजगार गेल्याने त्यांना मनरेगाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे देखील प्रयत्न  प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत. वसुमना पंत, प्रकल्प अधिकारी- सर्व मजूर विविध ठिकाणी विखुरलेले असल्याने त्यांना एका ठिकाणी आणून परत आणणे हे मोठे आव्हान होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयाने ते शक्य झाले. पुढच्या टप्प्यात या मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या गावात परतल्याचा त्यांना...

Read More

नंदुरबारात ८४ अहवाल निगेटिव्ह

नंदुरबार (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशानरुप अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या लांबोळ्याच्या संशयीत महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान आज दिवसभरात ८४ अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.सुरुवातीचे बरेच दिवस ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले असून नवापूर, तळोदा, धडगाव हे तीनही तालुके कोरोनामुक्त राहिले आहेत.आता पर्यत जिल्ह्यातून ९१२ स्वॅब नमुने तपा सणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७८९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आतापर्यंत २१ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आले होते. त्यापैकी २ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून, तब्बल ९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता अॅक्टीव्ह कोरोणा रुग्णाची संख्या १० असुन त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज २२ जणांचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात आले असून, आज दिवसभरात प्राप्त झालेले ८४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही ९८ अहवालांची प्रतिक्षा कायम...

Read More

रोहयो अंतर्गत कोळदा येथे कामाला सुरुवात

नंदुरबार :- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना आपल्या गावातच काम मिळावे, या हेतूने नंदुरबार तालुक्यातील कोळदा व दुधाळे येथे जलसंधारण दिनाचे औचित्य साधून गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आला.कोरोना विषणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यात मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कामे हाती घेतली आहेत. आज महाराष्ट्र जलसंधारण दिनाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोळदा येथील 175 तर दुधाळे येथील 97 मजुर उपस्थित होते. त्यांना याठिकाणी महिनाभर पुरेल एवढे काम उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा, नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री अशोक पटाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री दिनेश वळवी, ग्रामविस्तार अधिकारी श्री भैय्या निकम, ग्राम विकास अधिकारी श्री संजय देवरे, ग्रामसेवक श्री गणेश मोरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करून हे काम सुरू करण्यात आले आहे. मजुरांना कामाच्या ठिकाणी तोंडाला रुमाल बांधूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सुरक्षित अंतर ठेवून काम करताना स्वतःची व परिवाराच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. जिल्हाभरात रोजगार हमी योजनेची विविध कामे सुरू करण्यात आली असून, मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला जात...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!