Author: Ramchandra Bari

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांचे रक्तदान

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि नंदुरबार जिल्हा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी रक्तदान करून  शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा रुग्णालयाचे रक्त संकलन अधिकारी, डॉ.एस.ए.सांगळे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र चव्हाण, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, जयेश सोनवणे, हेमंत माळी आदी उपस्थित होते. शिबिरात निवासी उपजिल्हाधिकारी  धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उल्हास देवरे, सहायक उपनिबंधक निरज चौधरी या अधिकाऱ्यांनी रक्तदान केले. शिबिरास विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 28 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. त्या सर्व रक्तदात्यांना राज्य रक्त संक्रमण परिषदचे प्रमाणपत्रही यावेळी वितरीत करण्यात आली. नागरिकांनी रक्तपेढीत जावून रक्तदान कराव, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले. नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमत देवकर, उपाध्यक्ष मिलिद निकम, सहायक चिटणीस, हेमत मरसाळे आदींनी या शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम...

Read More

पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या 64 गावांना धान्य वितरीत होणार

नंदुरबार : नवसंजीवनी योजनेअंतर्गत पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या 64 गावातील पात्र लाभार्थ्यांना जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी चार महिन्याचे धान्य वितरीत करण्यात येणार आहे. अंत्योदय कुटुंब योजना व प्राधान्य कुटुंबांना नवीसंजीवनी योजनेअंतर्गत पावसाळ्यापुर्वी चार महिने पुरेल इतका धान्य पुरवठा करण्यात येत आहे. यात अक्राणी तालुक्यातील 47 गावाचा तर अक्कलकुवा तालुक्यातील 17 गावाचा समावेश आहे. अंत्योदय कुटुंब योजना अंतर्गत अक्राणी तालुक्यातील 47 गावातील 4 हजार 382 कार्ड धारकांना 15 किलो गहू  व 20 किलो तांदुळ याप्रमाणे चार महिन्यासाठी 2629 क्विंटल गहू आणि 3505 क्विटल तांदूळ तर अक्ककुवा तालुक्यातील 17 गावातील 1 हजार 422 कार्ड धारकांना चार महिन्यासाठी 853 क्विंटल गहू आणि  1137 क्विटल तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांसाठी अक्राणी तालुक्यातील 47 गावातील 2 हजार 886 कार्ड धारकांना 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ याप्रमाणे 1146 क्विंटल गहू आणि  1719 क्विंटल तांदूळ, तर अक्कलकुवा तालुक्यातील 17 गावातील 1 हजार 463 कार्ड धारकांना 410 क्विंटल गहू  आणि 615 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. रास्तभाव दुकानदारांना चार महिन्याचे नियतन मंजूर करून धान्य वाटप करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेश दिले  असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली...

Read More

‘मिशन बिगीन अगेन’च्या पहिल्या टप्प्यास सुरुवात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश

नंदुरबार  : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर करोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसोबतच जनजीवन सामान्य करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले असून ‘मिशन बिगीन अगेन’ च्या पहिल्या टप्प्यास 3 जुनपासून  सुरुवात होत आहे.  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले असून त्यानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शारीरिक अंतर आणि करोना प्रतिबंधक सूचनांचे पालन न करणारी दुकाने अथवा संकुल तात्काळ बंद करण्यात येणार आहे.  जिल्ह्यांतर्गत बससेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असून आंतरजिल्हा बससेवेबाबत नंतर आदेश निर्गमित करण्यात येतील. आंतरराज्य बससेवादेखील बंद राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये सुरू राहतील. टॅक्सी, कॅब आणि रिक्शा सुरू राहतील, तथापि केवळ वाहनचालक आणि इतर दोन प्रवासी नेण्यास अनुमती राहील. चारचाकी वाहनाने देखील वाहनचालक व इतर दोन प्रवाशांना अनुमती असेल. दुचाकी वाहनावर केवळ चालकाला (एका व्यक्तीस) अनुमती असेल. सर्व प्रकारच्या मालवाहतूकीस अनुमती असेल. शहरी आणि ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यासदेखील अनुमती असेल. शहरातील सर्व दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, जीवनावश्यक व इतर वस्तूंसाठीची ई-कॉमर्स सेवा, खाजगी कार्यालये, शेती संदर्भातील कामे, बँक, कुरीअर आणि डाक सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, घरपोच सेवा देणारे हॉटेल्स, उपनिबंधक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालये सुरू ठेवण्यास अनुमती असेल. शासकीय कार्यालयात 100 टक्के उपस्थिती ठेवता येईल. प्रेक्षकाशिवाय वैयक्तिक व्यायामासाठी क्रीडांगणे सुरू ठेवण्यासही अनुमती राहील. मात्र इनडोअर उपयोगास अनुमती असणार नाही आणि  समुह किंवा गट यांना अनुमती नसेल. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.  हॉटेलमधील पार्सल सेवेलाच केवळ अनुमती असेल. शॉपींग...

Read More

सहा वर्षांच्या चिमुकलीची कोरोनावर मात

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 6 वर्षाच्या चिमुकलीसह 66 वर्षीय वयोवृद्धाने कोरोनावर मात केली आहे.  या दोघांसह एकूण 9 रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.  यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, डॉ. के.डी. सातपुते सह जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.  यावेळी डॉ.भोये यांनी कोरोना रुग्णाना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. कोविड संसर्गमुक्त  झालेल्या रुग्णात रजाळे येथील  चिमुकलीसह 28 वर्षीय व 55 वर्षीय महिलांचा तसेच 31,35 आणि 66 वर्षे वयाच्या पुरुषांचा  समावेश आहे.             शिंदखेडा तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष रुग्ण आणि जिल्हा रुग्णालयातील 2 कर्मचारीदेखील संसर्गमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात उपचारानंतर संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 28 असुन  3 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. अन्य 3 कोरोना बाधितांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.  कोरोना हा उपचाराअंती या रोग बरा होत असल्याने नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले...

Read More

हरिओम नगर साई भक्तांनी रक्तदान शिबिरातून साजरा केला मंदिराचा वर्धापन दिन

नंदुरबार (प्रतिनिधी ) – कोरोणा विषाणुमुळे उद्भवालेल्या परिस्थीतीमध्ये साई मदीराचा वर्धापनदिन कार्यक्रम साजरा करत येणार नसल्याने हरिओम नगर परिसरातील रहिवाश्यांनी आणि साईप्रेमीनी रक्तदान शिबिराचे आयोजन करत सामाजीक बांधीलकी जोपासत नवा आदर्श निर्माण केला आहे.       हरिओम नगर मधील साईबाबा मंदीर हे अनेक साईभक्तांचे आस्थाकेंद्र आहे. दरवर्षी या ठिकाणी 31 मे रोजी या मंदीराच्या वर्धापण दिनानिमित्त अनेक धार्मिक विधींचे आयोजन करत भंडाऱयाचा कार्यक्रम केल्या जातो. मात्र यंदा कोरोणा विषाणुच्या अनुशंगाने निर्माण झालेली परिस्थीती आणि त्यातच सोशल डिस्टसिंग सह अन्य नियमांचे पालन करावयाचे असल्याने साई भक्तांनी पुढे येत या दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात परिसरातील 40 साई भक्तांनी रक्तदान करत सामाजीक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. साई बाबांची सर्वधर्म समभावाची शिकवन रक्तदान सारख्या उपक्रमापेशा काय वेगळी असु शकते याचमुळे परिसरातील नागरीकांनी गरजु रक्तापासुन वंचीत राहुनये या भावनेतुन हा उपक्रम राबवला आहे.          या शिबिरात दिगंबर उपाध्ये, ऋत्विक चव्हाण, लक्ष्मीकांत बयानी, वैभव तांबोळी, अजय केदार, निसर्गदत्त बारी, गणेश मोरे, घनश्याम बारी, हितेश तांबोळी, स्वप्निल तांबोळी, प्रशांत तांबोळी, भारत मोरे, अथर्व रत्नाकर, प्रितेश कुवर, कल्पेश तांबोळी, राकेश तांबोळी, नरेंद्र ठाकूर, अजय मोरे, प्रमोद शिंदे, राहुल गायकवाड, नितीन जोशी, विजय तांबोळी, राजेश दुबे, तृप्ती बयानी, नीलिमा रत्नाकर, सागर मोरे, जितेंद्र सोनार, लखन सोनार, ऋषिकेश पाटील,  अविनाश गवळी अशा  एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!