हॉटेल, लॉजेस आणि गेस्ट हाऊस सुरू करण्यास परवानगी
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील हॉटेल आणि राहण्यासाठी सेवा उपलब्ध करून दिलेले लॉजेस व गेस्ट हॉऊसला 8 जुलै 2020 पासून एकूण क्षमतेच्या 33 टक्के प्रमाणात दिलेल्या अटींवर सुरू करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल बंद राहतील व जिल्हा प्रशासनाने क्वॉरंटाइन सेंटर म्हणून वापरात घेतलेले हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाऊस इत्यादी जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. आस्थापना व संस्था यांच्यासाठी व्यवस्था कोव्हीड 19 विषयी प्रतिबंधात्मक उपायांवर पोस्टर,स्टॅन्डीज,एव्ही मिडीया आणि दिशा निर्देश स्पष्टपणे दर्शविले जावेत. हॉटेल व बाह्य जागेत व पार्कींगच्या ठिकाणी गर्दीचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करावे. सामाजिक अंतर निश्चित करून ठिकठिकाणी मार्कींगची व्यवस्था करावी. प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनींग करणे बंधनकारक राहील. रिसेप्शन टेबल व जागेत सरंक्षक काचेची व्यवस्था करण्यात यावी. अतिथींसाठी पायाने चालणाऱ्या डिस्पेंन्सरीसह हॅन्ड सॅनीटायझर यांची रिसेप्शन, अतिथीगृह व सार्वजनिक ठिकाण (लॉबी इत्यादी) व्यवस्था करण्यात यावी. आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांसाठी तसेच अतिथी यांना संरक्षक साधनांसह फेस कव्हर, ग्लोव्हज व मास्क इत्यादी पुरविण्यात यावे. क्युआर कोड, ऑनलाईन फॉर्म्स, डिजीटल पेमेंट जसे ई-व्हाईलेट आदींचा उपयोग करावा. सोशल डिस्टसिंगचे पालन होईल इतक्या संख्येत लिफ्टचा वापर करावा. सीपीडब्ल्युडीच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून वातानुकूलीत उपकरणे, व्हेन्टीलेशन वापरावे. वातानुकूलीत उपकरणांचे 24-300 से. व वातावरणातील आर्द्रता 40-70 टक्के असणे आवश्यक आहे. तसेच हवा खेळती राहण्यासाठी उपाययोजना करावी. अतिथींबाबत सूचना केवळ लक्षण विरहीत अतिथींनाच परवानगी देण्यात यावी. मुखवटा (फेस कव्हर/ मास्क) परीधान करणाऱ्या अतिथींना प्रवेश देण्यात यावा. हॉटेलमध्ये संपूर्ण...
Read More