नंदुरबार :- जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या पुन्हा वाढत असून, आज शहरातील ३ रुग्णांसह जिल्ह्यातील १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १९० एवढी झाली आहे. त्याचप्रमाणे दिलासादायक म्हणजे आज ३० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहींना आज तर काहीना उद्या रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.

आज आढळुन आलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयातील पुरुष कर्मचारी ३४, शहादा येथील जिजाऊ नगरमधील २ रुग्ण त्यात १ पुरुष ४९, १ महिला ४२ यांचा समावेश आहे. तसेच शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील ६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यात ४ पुरुष २२,५७,७८, ४६ तर दोन महिला ३७, ३५ यांचा समावेश आहे. तसेच तळोदा येथील दामोदर नगर भागातील ५० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान रुग्णालयात दाखल असलेल्या तब्बल ३० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कोरोनामुक्त व्यक्तीपैकी २५ जणांना घरी सोडण्यात आले असून, उर्वरित कोरोना मुक्तांनाही घरी सोडण्यात येणार आहे.