Author: Ramchandra Bari

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेश 6 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेत 2020- 2021 या शैक्षणिक सत्रात तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता महाराष्ट्र राज्यातून बरगड (ओडिशा) येथे 13 व वेंकटगिरी येथील 2 जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या निवडीसाठी  प्रादेशिक उपायुक्त  वस्त्रोद्योग नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज 17 जुलै 2020 पर्यंत मागविण्यात आले होते. तथापी आय.आय.एच.टी बरगढ यांनी अर्ज सादर करण्यास 6 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रवेश अर्जाचा नमुना व अनुषांगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे संकेतस्थळ http://www.dirtexmah.gov.in  वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी  खोडे चवरे यांनी कळविले...

Read More

सुशिक्षित बेरोजगारांना आधार क्रमांकाची माहिती भरण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ऑनलाइन नाव नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी तात्काळ आधार क्रमांक प्रोफाईलमध्ये नमूद करून प्रोफाईल अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे. जिल्ह्यातील उमेदवारांची नाव नोंदणी 2013 पासून https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सुरू आहे. उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्यांना यूजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने संकेतस्थळावर उपलब्ध सुविधा आणि माहितीचा लाभ घेता येतो. उमेदवारांनी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक संकेतस्थळावर आपल्या प्रोफाईलमध्ये भरावा. प्रोफाईल अद्ययावत न केल्यास नाव नोंदणी 31 ऑगस्ट 2020 अखेर रद्द होईल. अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व...

Read More

‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यासाठी 11 महिनाच्या कालावधीकरीता ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ सुरु करण्यात येत असून युवकाना 27 जुलै 2020 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ अंतर्गत  आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमासाठी  नीती आयोगद्वारे निर्धारीत करण्यात आलेले उद्दिष्ट आणि संकेतांक प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासाठी या युवाशक्तीचा उपयोग करुन घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या फेलोशिपचे नियोजन व संचालन करण्यासाठी पिरामल फाऊंडेशन या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. फेलोशिपच्या माध्यमातून प्रतिभावंत युवकांना जिल्हास्तरावर  काम करण्याची संधी मिळणार आहे. फेलोशिपचा अर्ज करण्यासाठी युवक भारतीय नागरीक असावा. महाराष्ट्रातील युवकांना प्राधान्य देण्यात येईल. अर्जदार 21 ते...

Read More

नवीन शिधापत्रिका वितरीत करण्यासाठी विशेष मोहिम जिल्ह्यातील 36 हजार नागरिकांना दिला अन्नधान्याचा लाभ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या नवीन शिधापत्रिका वितरीत करण्याच्या विशेष मोहिमे अंतर्गत गेल्या 4 महिन्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत 10 हजार 768 शिधापत्रिकांची वाढ झाली असून त्यामुळे जिल्ह्यातील 36 हजार 231 व्यक्तिंना अन्नधान्याचा लाभ होणार आहे. शिधापत्रिका नसलेल्यांना त्या उपलब्ध करून देणे आणि शिधापत्रिका असलेल्यांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ देणे अशा दोन्ही पातळ्यांवर ही मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार 4100 नव्या शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या, तर 6 हजार 668 शिधापत्रिकांचा समावेश वरील दोन्ही योजनेत करण्यात आला. अंत्योदय योजनेअंतर्गत एकूण 3719 शिधापत्रिकांची वाढ झाली आहे. त्यापैकी अक्कलकुवा 1713, अक्राणी 1060, शहादा 1231 आणि नंदुरबार तालुक्यातील 261...

Read More

ग तु पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा एन जे सोमाणी

नंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील नंदुरबार तालुका विधायक समितीच्या ग. तु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी भौतिकशास्त्र विषयाचे जेष्ठ प्राध्यापक निलेश जमनादास सोमाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नंदुरबार शहरातील सर्वात जुन्या अश्या ग. तू. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात भौतिक शास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून जेष्ठ प्रा. निलेश जमनादास सोमाणी हे32 वर्षांपासून कार्यरत आहेत. मितभाषी व अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणून त्यांची समाजात व शैक्षणिक क्षेत्रात ओळख आहे. प्रा. एन. जे. सोमाणी यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल नं. ता. वि. समितीचे अध्यक्ष श्री. मनोज रघुवंशी, संस्थेचे उपाध्यक्ष माजी ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ऍड. राजेंद्र रघुवंशी व संस्थेचे संचालक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. सोमाणी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!