Author: Ramchandra Bari

नंदुरबारात कोरोनाचा नवा विक्रम

नंदुरबार (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात आज कोरोनाने नवा विक्रम केला असून तब्बल ६६ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. दिवसेंदिवस कोरोणा विषाणुचा विळखा जिल्ह्यात वाढतांना दिसुन येत आहे.  आता जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा हा ७१८ वर पोहचला आहे. यातील ३९ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून ४०७ जण उपचारानंतर संसर्गमुक्त होवुन घरी परतले आहेत. २४८ जणांवर उपचार सुरु आहे. आज आढळून आलेल्या एकूण 66 रुग्णांमध्ये शहादा तालुक्यातील सारंगखेडा ८ रुग्ण ( 55पुरुष, 61पुरुष, 4पुरुष, 30महिला, 50पुरुष, 62 पुरुष, 51महिला, 23महिला), परीमल कॉलनी, शहादा १ रुग्ण (41 पुरुष), सोनार गल्ली, शहादा १ रुग्ण (70महिला), ब्राह्मणपूरी ता.शहादा १ रुग्ण (22महिला), कोविड केअर सेंटर,...

Read More

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत मॉल आणि व्यावसायिक संकुल सुरू करण्यास परवानगी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2020 पर्यंत काही शिथीलतेसह लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्गमित केले आहेत. त्यानुसार 5 ऑगस्ट पासून मॉल आणि व्यावसायिक संकुले निर्धारीत वेळेत सुरू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. चित्रपट गृह सुरू करण्यास अनुमती देण्यात आलेली नाही. मॉल आणि व्यावसायिक संकुल (मार्केट कॉम्प्लेक्स), दुकाने, आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. जिल्ह्यांतर्गत बससेवा ही जास्तीत जास्त 50 टक्के प्रवाशी क्षमतेने राहणार असून आंतरजिल्हा बससेवेबाबत शासनाकडून  सूचना आल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. आंतरराज्य बससेवादेखील बंद राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी...

Read More

शिक्षक बदल्यांबाबत नंदुरबार जि. प. ची झूम मिटिंग

नंदुरबार(प्रतिनिधी):- जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑफलाइन जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यातील शिक्षक संघटनांना माहिती व्हावी, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी झूम मीटिंगद्वारे चर्चेचे आयोजन केले आहे. दिनांक ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चर्चेत संघटनेच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांना पंचायत समिती येथे उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे.याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांच्या १५% जिल्हांतर्गत बदल्या शासन निर्णय दिनांक २७/२/२०१७ मधील तरतुदी नुसार ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबत शासनाकडून कळविण्यात आलेले आहे. या बदल्यांबाबत संघटनेशी चर्चा करणेकरीता नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी...

Read More

स्वॅब तपासणीवर अधिक भर द्या- ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :प्रतिबंधीत क्षेत्रातील प्रत्येक संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीवर अधिक भर द्यावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यानी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, आदी उपस्थित होते.             ॲड.पाडवी म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्रात नागरीकांच्या प्रबोधनावर भर द्या. खाजगी कोविड रुग्णालयात शासकीय दराने सेवा दिली जाईल व नियमांचे पालन होईल यांची दक्षता घ्यावी. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. त्यासाठी रुग्णाची प्राथमिक लक्षणे असताना स्वॅब...

Read More

नंदुरबार व शहादा येथे नियंत्रण कक्ष स्थापित करा-जिल्हाधिकारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :कोविड-19 संसर्गाबाबत दैनंदीन माहिती मिळविणे, विविध यंत्रणांमध्ये समन्वय व मा‍हितीच्या विश्लेषणासाठी नंदुरबार व शहादा येथे नियंत्रण कक्ष स्थापित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बोडके आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, संसर्ग रोखण्यासाठी उपायोजनांमध्ये माहितीचे विश्लेषण महत्वाचे ठरणार आहे. प्रत्येक मूळ बाधिताच्या संपर्कातील व्यक्तिंची माहिती संकलन करण्यावर विशेष  लक्ष देण्यात यावे. अशा व्यक्तिंचे स्वॅब त्याच...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!