Author: Ramchandra Bari

लोकशाही दिनाचे आयोजन नाही

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 7 सप्टेंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित होणार नाही.  लोकशाही दिनात अर्ज करावयाचा असल्यास अर्जदारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज [email protected]  या ईमेलवर किंवा 9403644685 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्यात यावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले...

Read More

16 व 17 सप्टेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार मार्फत 16 व 17 सप्टेंबर 2020 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून यामधील मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तसेच भ्रमणध्वनीद्वारे घेण्यात येणार आहे.             स्थानिक उद्योजकांना रिक्तपदे भरावयाची असल्यास त्यांनी योग्य, गरजू उमेदवार उपलब्ध होण्यासाठी या ऑनलाईन मेळाव्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर पोर्टलवर आपला नोंदणी क्रमांक वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी. नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी पोर्टलवर ‘जॉबसिकर रजिस्टर’ या  पर्यायाचा उपयोग करून  शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व माहिती अद्ययावत करावी. नोंदणी झाल्यावर भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन वेबपोर्टलवर ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग नोंदवावा. भरती इच्छूक नियोक्त्यांनी अधिकाधिक रिक्त पदे संकेतस्थळावर अधिसूचित करावी. याबाबत काही अडचणी असल्यास या कार्यालयाच्या 02564-210026 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.  ऑनलाईन मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी आणि उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ.ला.तडवी यांनी केले...

Read More

लाळ-खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2020 पर्यंत ‘लाळ-खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिम’ राबविण्यात येत असून जिल्ह्यातील पशुपालकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे  आवाहन जिल्हा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. लाळ-खुरकत हा पशुधनातील विषाणूजन्य रोग आहे. या रोगास लाळ्या, तोंडखुरी, पायखुरी असेही म्हणतात. प्रामुख्याने हा रोग पायात द्विखुरी असलेल्या जनावंरामध्ये आढळतो. या रोगाचा प्रसार हवेवाटे, हवा वाहणाऱ्या दिशेने, कळपातल्या कळपात बाधित जनावरांमुळे, जनावरांची पाणी प्यावयाची जागा, गव्हाणी व लागणारी भांडी , गुरांचे बाजार, आठवडी बाजार, जत्रा, पशुप्रदर्शने, साखर कारखाने, इत्यादी ठिकाणाहून अधिक प्रमाणात होतो.  या रोगामुळे जनावंरामधील मृत्यूदर जरी कमी असला तरी रोगाचा प्रादुर्भाव तीव्र स्वरुपाचा असल्याने गाई- म्हशींचे दूध देणे कमी होते. तसेच शेतीकाम, ओढकामासाठी वापरण्यात येणाऱ्या बैलांमध्ये अशक्तपणा येऊन शारीरिकदृष्ट्या कमकुवत होऊन बैलांपासून होणाऱ्या शेतीकामास व ओढकामास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. केंद्र पुरुस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तसेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील 100 टक्के पशुधनास लसीकरण करण्यात येणार आहे. त्यात गायवर्ग 3 लाख 36 हजार नऊशे सात, म्हैसवर्ग 72 हजार 100, शेळ्या 2 लाख 72 हजार सातशे त्र्येपन्न, मेंढ्या 15 हजार दोनशे शहात्तर असे एकूण 6 लाख 97 हजार छत्तीस पशुधनास सहा महिन्यांच्या अंतराने वर्षांतून 2 वेळा लसीकरण करावयाचे आहे. यासाठी पहिल्या फेरीसाठी जिल्ह्यास 3 लाख 41 हजार लसी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील 100 टक्के जनावरांची ओळख पटविण्यासाठी कानात लावावयाचे टॅग व ॲपलिकेटरही या मोहिमेतंर्गत लावण्यात येणार आहेत. लसीकरण केल्यामुळे जनावरांच्या...

Read More

निवृत्तीवेतन धारकांना जुना किंवा नवा कर पर्याय निवडण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : करपात्र निवृत्तीवेतन असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी जुना कर पर्याय (ओल्ड टॅक्स रिजीम) किंवा नवा कर पर्याय (न्यू टॅक्स रिजीम) पैकी एकाची निवड करून जिल्हा कोषागार कार्यालयास  [email protected]  या ईमेल पत्त्यावर पाठवावे. आर्थि‍क वर्ष 2020-21 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या आयकर सेक्शन 115बीएसी  नुसार आर्थिक वर्ष 2020-21 च्या आयकर गणनेसाठी (ओल्ड टॅक्स रिजीम) किंवा नवा कर पर्याय (न्यू टॅक्स रिजीम) असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत. निवृत्तीवेतन धारकांनी या दोन प्रकारापैकी  योग्य असणारा पर्याय निवडावा. याकरीता आवश्यक असल्यास आपल्या नजीकच्या सनदी लेखापालांचीही मदत घ्यावी. आपण निवडलेले पर्याय या वरील ईमेल पत्त्यावर आपल्या नाव, पीपीओ क्रमांक, बँकेचे नाव , शाखेचे नाव सहित 30 सप्टेंबर 2020 पूर्वी कळविण्यात यावा, जेणेकरुन आपण निवडलेल्या पर्यायानुसार देय होणारी  टीडीएस वजाती करता येईल. जे निवृत्तीवेतन धारक टॅक्स रिजीमची निवड वेळेत कळविणार नाहीत त्यांची पूर्वीप्रमाणेच टीडीएस वजावट करण्यात येईल याची नोंद घ्यावी,  असे  जिल्हा कोषागार अधिकारी  देविदास पाटील यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!