Author: Ramchandra Bari

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांची शहादा येथे भेट

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र  भारुड यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा आढावा घेण्यासाठी शहादा तालुक्याला भेट दिली. त्यांनी उपविभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत मोहिमेचा आढावा घेतला. बैठकीस परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश, उपविभागीय अधिकारी डॉ.चेतन गिरासे, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, तहसीलदार मिलींद कुलकर्णी, गट विकास अधिकारी पी.टी.गोस्वामी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी आर.एन.वळवी आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, सर्वेक्षण करताना नागरिकांना आरोग्यासंदर्भात मार्गदर्शनही करावे. कोरोना बाधितांची संख्या अधिक असलेल्या गावात तापाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष द्यावे. मोठ्या गावात अधिकाधीक व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यावर भर द्यावा. मोहिमेचे काम कालमर्यादेत पूर्ण करण्याबरोबर ऑनलाईन माहिती भरण्याचे कामही वेळेवर करावे,...

Read More

सर्वेक्षणाद्वारे कोरोना संसर्ग साखळी खंडीत करण्याचा प्रयत्न करा – महेश पाटील

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून केले जाणारे सर्वेक्षण केवळ माहिती संकलनासाठी मर्यादीत न ठेवता सर्वेक्षणात आढळणाऱ्या संशयित व्यक्तींची त्वरीत स्वॅब चाचणी करून कोरोना संसर्ग साखळी खंडीत करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले. तळोदा येथे आयेाजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी श्रीमती सावित्री खर्डे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. श्री.पाटील म्हणाले, संदर्भित व्यक्तींची तातडीने स्वॅब चाचणी करण्यात यावी. त्यासाठी फिरत्या पथकाचा उपयोग करण्यात यावा. अधिक लोकसंख्येच्या भागात सर्वेक्षणासाठी  अधिक पथकांची नेमणूक करावी. अधिक जोखिमीच्या व्यक्तींच्या उपलब्ध यादीचा सर्वेक्षणात उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले. श्री.पाटील यांनी तळवे आणि चिनोदा येथील सर्वेक्षणाची माहिती घेतली आणि नागरिकांशी संवाद...

Read More

कोरोनाबाबत सूचना न पाळल्यास दंडात्मक कारवाई -डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या सूचना न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देण्यासाठी प्रशासनातर्फे  विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर जाण्याची परवानगी असलेल्या प्रत्येक नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या सुचनेचे पालन करणे आवश्यक आहे. परंतू अद्याप काही नागरीक यांचे पालन करतांना आढळून येत नाही.  त्यामुळे प्रशासनाने दंडात्मक कारवाईचे आदेश यापूर्वी निर्गमित केले होते. सुधारीत आदेशानुसार दंडाच्या रक्कमेत सुधारणा करण्यात आली आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकताना प्रथम आढळल्‍यास रु.200 इतका दंड आकारण्यात येईल, दुसऱ्यांदा रु.400 आणि तिसऱ्यांदा रु.400 दंड व फौजदारी कारवाईस पात्र राहील. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क, रुमाल न वापरल्यास प्रथम रु.200 दुसऱ्यांदा रु. 400 तर तिसऱ्यांदा रु.400 दंड व फौजदारी कारवाई  करण्यात येईल. शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन न केल्यास प्रथम रु.200 दंड प्रतिग्राहक, व्यक्ती, प्रती आस्थापना मालक-विक्रेता, दुसऱ्यांदा रु.400 दंड, तर तिसऱ्यांदा आढळल्यास रु.400 दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस व महसूल कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले असून सर्व नागरीकांनी याचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

इंग्रजी पहिलीसाठी 5 ऑक्टोबर रोजी प्रवेश प्रक्रीया

नंदुरबार : अक्क्लकुवा तालुक्यातील दाब येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत 2020-21 वर्षात पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी 5 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा येथे प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्याच्या अनुसूचित जातीच्या मुलांना शासनाच्या निर्णयानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत शाळेसाठी पालकांनी सादर केलेल्या प्रवेश अर्जातून शासनाकडून मंजूर असलेल्या 40 जागांसाठी पात्र विद्यार्थ्यांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक ‍जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!