Author: Ramchandra Bari

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रौत्सव, दुर्गापुजा, दसरा हे उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.             सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका,नगरपालिका,स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबत धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.   या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती गणपती 2 फूटांच्या मर्यादेत असावी.  या वर्षी शक्यतो पारंपारीक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.  विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्य विषयक उपक्रम,शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.  आरती, भजन, किर्तन वा अन्य...

Read More

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतंर्गत जिल्ह्यात 10 लाख 22 हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत सर्व सहा तालुक्यात आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत असून बुधवारी 1 लाख 6 हजार 259 नागरिकांची आरोग्य  तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 10 लाख 22 हजार 82 घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आरोग्य तपासणी आणि कोरोनाविषयक जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी कोरोना चाचणी शिबिराचे आयोजनदेखील करण्यात येत आहे. आरोग्य तपासणीत कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत स्वॅब तपासणी करून संबधित व्यक्तीस उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक माहितीदेखील देण्यात येत आहे. एकूण  482 पथकामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत असून बुधवारी 23 हजारापेक्षा अधिक घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. आतापर्यंत 2 लाख 28 हजार 385 घरांना भेटी देण्यात आल्या. नंदुरबार तालुक्यातील 2 लाख 2 हजार 61, अक्कलकुवा 1 लाख 35 हजार 6, धडगाव 1 लाख 62 हजार 260, नवापूर 1 लाख 75 हजार 490, शहादा 2 लाख 47 हजार 597 आणि तळोदा तालुक्यातील 99 हजार 668 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  मोहिमेला गती देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी स्वत: सर्वेक्षणाच्या ठिकाणी भेट देत आहेत. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणीचे सूक्ष्म नियोजन केले असून सर्वेक्षणाची माहिती ऑनलाईन नोंदविण्यात येत आहे. सर्वेक्षणात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्यात येत...

Read More

बाळासाहेब ठाकरे ग्रामिण परिवर्तन प्रकल्पांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून शेतमाल, शेळ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मुल्यसाखळी विकास, मुल्यसाखळी विकासाची उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पासाठी 15 डिसेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.             अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थांमध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकटी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियांनातर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे.  तर खरेदीदार संस्थामध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील कॉपोरेट, प्रक्रियादार, निर्यातदार, लघू मध्यम उद्योजग, स्टार्टअप्स, कोणताही खरेदीदार आदींचा समावेश आहे.             प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाचे 60 टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येईल. अर्ज सादर करण्यासाठीचे पात्रतेचे निकष व अर्जाचा नमुना आदी माहितीसाठी https://www.smart-mh.org यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनंत पोटे यांनी केले...

Read More

कर्मचाऱ्यांच्या सर्वंकष माहितीकोषात माहिती अद्ययावत करावी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा ) : जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सर्वंकष माहितीकोषात सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती 1 जुलै 2020 या संदर्भ दिनांकास अनुसरुन अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी,नंदुरबार यांनी केले आहे.. माहिती अद्ययावत करण्याचे काम https://des2.mahaonline.gov.in/CGE/logout.do या संकेतस्थळावर करण्यात आले आहे. माहिती कशी भरावी या संदर्भात सूचना संचही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.   सर्व कार्यालयानी माहितीकोष आज्ञावली वापरण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड 15 सप्टेंबर 2020 पर्यंत जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावा. माहिती सादर करून पहिले प्रमाणपत्र 15 डिसेंबर 2020 पर्यंत प्राप्त करुन घ्यावेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्रृटीचे निवारण करुन माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र 16 डिसेंबर 2020 ते 17 मार्च 2021 पर्यंत प्राप्त करुन घ्यावे. शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष-2020 माहिती प्राप्त झाल्याचे पहिले प्रमाणपत्र जोडल्याशिवाय माहे डिसेंबर 2020 पेन इन जानेवारी 2021 चे वेतन देयक  कोषागार कार्यालयात स्विकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय,नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत रुम नंबर 221, टोकरतलाव रोड, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210044, भ्रमणध्वनी क्रमांक 9767263866) वर संपर्क...

Read More

जिल्ह्यात 25 हजार शेतकऱ्यांना 273 कोटीचे पीक कर्ज वाटप

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात यावर्षी 25 हजार 210 शेतकऱ्यांना 273 कोटी 9 लाख एवढ्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम एकूण उद्दीष्टाच्या 44 टक्के असून गतवर्षीपेक्षा 45 कोटीने जास्त आहे. जिल्हा सहकारी बँकेने सर्वाधिक 12 हजार 856 शेतकऱ्यांना 82 कोटी 10 लाख कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बँकेने 487 शेतकऱ्यांना 4 कोटी 96 लाख तर खाजगी बँकांनी 792 शेतकऱ्यांना 21 कोटी 50 लाख, तर राष्ट्रीयकृत बँकांनी 11 हजार 75 शेतकऱ्यांना 164 कोटी 53 लाखाचे पीक कर्ज वाटप केले आहे. गतवर्षी खरीप हंगामात 15  हजार 293 शेतकऱ्यांना 228 कोटी 35 लाख अर्थात उद्दीष्टाच्या 39 टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले होते.             यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार तालुका स्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना कर्ज वाटप वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनातर्फे बँकाकडे पीक कर्जाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे कर्ज वाटपाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यापुढील काळातदेखील कर्ज वाटप वाढविण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे. लीड बँक व्यवस्थापकांनी प्रत्येक आठवड्यात पीक कर्ज वाटपाचा आढावा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी समस्या येत असल्यास त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील डॉ.भारुड यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!