Author: Ramchandra Bari

जिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : हवामान खात्याने जिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे व योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  खबरदारीची उपाययोजना म्हणून विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे.  मोकळया जागेत असल्यास आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे.             आकाशात विजा चमकत असल्यास घरात‍ किंवा सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरात असताना आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्वरीत बंद करावे. ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासुन दुर राहा. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे. या गोष्टी करू नका आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नका. शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे असतांना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेवू नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नका. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका. घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडतांना पाहू नका, हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश जिल्ह्यात 17 ऑक्टोबर पर्यंत विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने तलाठी, मंडळ अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यांनी याबाबत आवश्यक ती खबरदारी घेवून मुख्यालय सोडू नये. तसेच मंडळ निहाय पावसाचा व नुकसानीचा अहवालाची माहिती तालुका नियंत्रण कक्षात घ्यावी व दर दोन...

Read More

जिल्ह्यात 20 हजार नागरिकांची कोरोना चाचणी

नंदुरबार – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधीक नागरिकांची स्वॅब चाचणी करण्यावर भर देण्यात येत असून आतापर्यत  20 हजार 104 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब सुरू झाल्यानंतर स्वॅब चाचणीचा वेग वाढविण्यात आला. नंदुरबार तालुक्यात 8869, शहादा 6359, तळोदा 1677, नवापूर,1620, अक्कलकुवा 853, धडगाव 130 आणि इतर जिल्ह्यातील 596 व्यक्तिंची चाचणी करण्यात आली आहे त्यापैकी 5534 व्यक्तिंचे अहवाल पॉझिटीव्ह आले  आहेत. 4900 कोरोनाबाधित उपचाराअंती बरे झाले आहेत तर 492 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बाधित व्यक्ती असलेल्या भागात शिबिराच्या माध्यमातून स्वॅब चाचणी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे. काही ठिकाणी गावातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन स्वॅब  चाचणीसाठी नागरिकांना प्रोत्साहीत केले. धडगाव येथे संसर्गाचे प्रमाण तर शहादा आणि नंदुरबार येथे जास्त आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गतदेखील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांची स्वॅब चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत लक्षणे आढळलेल्या साधारण 800 व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात आली आहे. त्यातील पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्तिंवर त्वरीत उपचारदेखील सुरू करण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी खाजगी रुग्णालयात आलेल्या तापांच्या रुग्णांचीदेखील तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. जास्त कोरोनाबाधित असलेल्या गावातील नागरिकांची स्वॅब चाचणी करण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले आहेत. कोरोना चाचणीसाठी 10 फिरत्या पथकांची सुविधादेखील करण्यात आली आहे. स्वॅब चाचणींची संख्या वाढल्याने संसर्ग वाढीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न...

Read More

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

नंदुरबार  – राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात 24 हजार 771 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून 24 दहजार 671 शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या  खात्यात 186 कोटी 46 लक्ष वितरीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्ती  योजनेची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यात तात्काळ आधार प्रमाणिकरणास सुरूवात करण्यात आली होती. पालकमंत्री ॲड.के.सी .पाडवी यांनी  प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळेपर्यंत कर्जमुक्तीची प्रक्रीया सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. जिल्ह्यातील महसूल यंत्रणा आणि सहकार विभागाने परस्पर समन्वयाच्या माध्यमातून आधार प्रमाणिकारणाचे चांगले नियोजन करण्यात आले. आधार प्रमाणिकरणातील अडचणी सोडविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना सूचनास दिल्या. सहकार विभागामार्फत ग्रामीण भागात 5 पथके तयार करून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करून घेण्यात आले. या पथकांनी दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहितीदेखील पोहोचवली. काही शेतकऱ्यांच्या हंगामी स्थलांतरामुळे येणाऱ्या अडचणीतूनही या पथकांनी मार्ग काढत अधिकाधीक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करून घेतले. नंदुरबार तालुक्यात 9418, नवापूर 3364, तळोदा 1746, अक्कलकुवा 2179, शहादा 7117 आणि अक्राणी 947 अशा एकूण 24 हजार 771 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले. प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम वितरीत करण्याचे कामदेखील तात्काळ करण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यात 9375 शेतकऱ्यांच्या खात्यात 71 कोटी 30  लक्ष, नवापूर 3358 शेतकऱ्यांच्या खात्यात 23 कोटी 1 लक्ष, तळोदा 1722 शेतकऱ्यांच्या खात्यात 15 कोटी 36 लक्ष, अक्कलकुवा 2171 शेतकऱ्यांच्या खात्यात 15 कोटी 8 लक्ष, शहादा 7104 शेतकऱ्यांच्या खात्यात 58 कोटी 8 लक्ष आणि अक्राणी 944 शेतकऱ्यांच्या खात्यात 3 कोटी 63 लक्ष असे एकूण 24 हजार 671 शेतकऱ्यांच्या खात्यात 186...

Read More

‘निरीक्षण’ मुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजात पारदर्शकता

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागांतर्गत नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयाने तयार केलेल्या ‘निरीक्षण’ ॲपमुळे विविध विकास योजनांची वस्तुनिष्ठ माहिती मिळत असून कामकाजात गती आणण्यात मदत होत आहे.             आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभागात आणि विशेषत: नंदुरबार जिल्ह्यात नव्या संकल्पना राबविण्यात येत आहेत. प्रकल्प अधिकारी वसुमना पंत आणि अविश्यांत पांडा यांनी दैनंदिन कामकाजाचे विश्लेषण आणि अवलोकन करण्यासाठी या ॲपची संकल्पना पुढे आणली आहे.             दोन महिन्यापूर्वीच ॲपची निर्मिती करण्यात आली. प्रायोगिक तत्वावर वापर करताना निदर्शनास आलेल्या त्रूटी दूर करून त्याचे अधिक विकसीत...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!