Author: Ramchandra Bari

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड  यांनी  18 ऑक्टोबर 2020 रोजी  सकाळी 6 वाजल्यापासून 1 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात...

Read More

परदेशात शिक्षणासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाखापर्यंत

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा 6 लाख पर्यंत वाढविण्यात आली आहे. सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,नवापूर रोड नंदुरबार ( दूरध्वनी क्रमांक-02564-210303) येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले...

Read More

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आठवडे बाजार व वाचनालयास परवानगी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासकीय आणि खाजगी वाचनालये, स्थांनिक आठवडे बाजार आणि जनावराचे बाजार सुरु करण्यास परवानगी देण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्देश दिले आहेत. या सर्व ठिकाणी कोविड-19 संदर्भात प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. यापूर्वी मार्केट व दुकानांना सायंकाळी 7 पर्यंत परवानगी देण्यात आली होती. आता सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहतील. औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास अनुमती राहील. सर्व दुकाने व आस्थापनांनी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन आदी बंधने पाळणे आवश्यक आहे. करमणुकीसाठी बागा,उद्याने आणि सार्वजनिक खुल्या ठिकाणी एकत्र येण्यास तसेच बिझनेस टू बिझनेस विषयक प्रदर्शनासदेखील परवानगी देण्यात आली आहे. सर्व शाळा, महाविद्यालये ,शैक्षणिक आणि कोचिंग संस्था बंद राहतील. ऑनलाईन, अंतराचे, दुरस्थ शिक्षणास परवानगी असेल. सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण तसेच दुरध्वनीद्वारे मार्गदर्शन आणि यासंबंधित सर्व कामकाज करण्यासाठी 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गास उपस्थित राहण्यास परवानगी राहील. राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास अभियान किंवा भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांचेकडील नोंदणीकृत असलेले अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रे सुरू राहतील. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था, भारतीय उद्योजक संस्था आणि त्यांच्या प्रशिक्षण प्रदात्यांनादेखील परवानगी असेल. त्यांनी आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय यांचेकडील निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. उच्च शिक्षण संस्थामध्ये दुरस्थ शिक्षण हे प्राधान्य प्राप्त अध्यापनाचे साधन म्हणून सुरू राहील, त्याचबरोबर उच्च शिक्षण संस्थामध्ये  संशोधन अभ्यासकासाठी (पीएचडी) विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील...

Read More

महिला लोकशाही दिनाचे आयोजन नाही

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : समस्याग्रस्त व पीडीत महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जाणारा ऑक्टोंबर महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता होणार नाही.  महिला लोकशाही दिनात अर्ज करावयाचा असल्यास अर्जदारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज अर्ज [email protected]  या ईमेलवर किंवा 9403103922 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 19 ऑक्टोबर  रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठवावेत.   सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,रुम नंबर 226, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,टोकरतलाव रोड,नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047) येथे संपर्क साधावा, असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सु.शं.इंगवले यांनी कळविले...

Read More

महिला व बालकांचे पोषण

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या निती आयोगाने देशभरातून निवड केलेल्या 115 आकांक्षित जिल्ह्यात नंदुरबार जिल्हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन 2018 ते 2022 दरम्यान नियोजनबद्ध पद्धतीने जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांकात सुधारणा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने कुपोषण समस्येवर मात करण्याचे प्रयत्न होत असून त्यात यश मिळताना दिसत आहे.             जिल्ह्यात आदिवासी बांधव ऑक्टोबर ते मे या कालावधीसाठी मोठ्या संख्येने रोजगाराकरिता इतर जिल्हा किंवा परराज्यात स्थलांतरित होतात. ही कुटुंबे मे अखेर जिल्ह्यात परत येतात. परंतु कामाच्या ठिकाणी त्यांच्याकडून आरोग्याच्या बाबतीत खूप दुर्लक्ष होते. त्यामुळे जिल्ह्यात परत आल्यावर कुपोषण, तीव्र रक्तक्षय, दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!