Author: Ramchandra Bari

22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन, समस्या निवारणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन – गणेश मिसाळ

नंदुरबार (जिमाका वृत्त) – प्रत्येक वर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीचा जिल्हास्तरावरील कार्यक्रम 22 डिसेंबर 2023 रोजी तळोदा तहसिल कार्यालय येथे  सकाळी 11 वाजता होणार असल्याचे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने सर्व कंपन्यांचे विक्री अधिकारी 22 ते 24 डिसेंबर या कालावधी उपस्थित राहणार असून ज्या ग्राहकांच्या समस्या असतील त्यांनी एचपीसी कंपनीचे विक्री अधिकारी सागर चव्हाण भ्रमणध्वनी क्रमांक 7709240437 व ईमेल [email protected] , आयओसी कंपनीचे विरेंद्र अहिरवार भ्रमणध्वनी क्रमांक 8010791969 व ईमेल [email protected]   तसेच बीपीसी कंपनीचे पवन भारती भ्रमणध्वनी क्रमांक 8128682291 व ईमेल [email protected]  त्यांच्याशी संपर्क साधावे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

अशासकीय संस्थांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी व्हावे – र. सो. खोडे

नंदुरबार (जिमाका वृत्त) – शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत अशासकीय संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी र.सो.खोडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्था, स्थानिक शेतकरी, सरकारी साखर कारखाने यांना यंत्रसामग्री आणि इंधन या दोन्हींचा खर्च देणे प्रस्तावित असून अल्प, अत्यअल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचे प्रस्ताव नंदुरबार व नवापूर तालुक्यासाठी [email protected],  शहादा व तळोदा तालुक्यासाठी [email protected]  व धडगांव व अक्कलकुवा तालुक्यासाठी [email protected]  या ईमेल पत्त्यांवर  अथवा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग, पद्मावती नगर प्लॉट नं. 17 श्रमसाफल्य् इमारत धुळे रोड, नंदुरबार  येथे  प्रस्ताव सादर करावेत. जिल्हास्तरीय समितीकडे आलेल्या प्रस्तावावर वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने संबंधित संस्थांची पात्रता व क्षमता तपासून एका जलसाठ्यासाठी एका संस्थेस गाळ उपसण्यास मान्यता देण्यात येईल असेही जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. खोडे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

‘प्रति थेंब अधिक पिक’ सुक्ष्म सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – सी.के. ठाकरे

नंदुरबार, दिनांक 19 डिसेंबर 2023 (जिमाका वृत्त) –  राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजनेच्या वर्ष 2023-24 मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी.के. ठाकरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजना वर्ष सन 2023-24 साठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व बहुभूधारकांना 45 टक्के अनुदान देण्यात येते. अनुसुचित जाती व अनुसूचीत जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती योजने 35 टक्के व 45 टक्के पुरक अनुदान देय असल्याने पात्र असलेल्या शेतकऱ्यांना मंजुर मापदंडाच्या 90 टक्के  मर्यादेत अनुदान देण्यात येते.  वर्ष 2023-24 मध्ये जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता रुपये 12 लाख  व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी रुपये 275 लाख 61 हजार निधी शिल्लक आहे. सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या अनु.जाती व अनु.जमाती लाभार्थ्यांचे अर्जाचे प्रमाण कमी असल्याने अर्ज नोंदणीसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.  अर्ज रद्द होणार नाही यासाठी अचुक माहीती भरावी. अर्ज करतांना सातबारा, 8 अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आवश्यक असून आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असावी. नोंद नसल्यास विहीर, शेततळे याबाबत स्वयं घोषणापत्र देण्यात यावे....

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!