Author: Ramchandra Bari
वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान उपलब्ध
Posted by Ramchandra Bari | Apr 12, 2022 | कृषी |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियांन (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी, पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी प्रती हेक्टरी 30 हजार प्रती लाभार्थी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यास 15 हेक्टर क्षेत्राकरिता 4 लाख 50 हजाराचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. वैरणीसाठी शेवगा लागवड योजनेअंतर्गत प्रती हेक्टरी 7.5 किलो शेवगा (पीकेएम-1) बियाण्याची किंमत 6 हजार 750 व उर्वरित 23 हजार 250 अनुदान लाभार्थ्यांनाहे दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यात येईल. यात पशुपालकांना बियाण्याचा थेट पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्चासाठी देण्यात येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी, पशुपालक यांनी संबंधित जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ,जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले...
Read Moreरब्बी हंगामातील भरडधान्य खरेदीकरिता पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
Posted by Ramchandra Bari | Apr 12, 2022 | कृषी |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : रब्बी हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने मका,ज्वारी,बाजरी आदी भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांची NeML पोर्टलवर 13 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम. एस. सोनवणे यांनी केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढील ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करता येईल. शेतकरी सहकारी संघ लि.नंदुरबार. नोंदणीचे ठिकाण संघ कार्यालय, नंदुरबार (कृष्णा पाटील 97632 86860), शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.शहादा जि.नंदुरबार नोंदणीचे ठिकाण संघ कार्यालय, शहादा (सागर पटेल 7770074177 ) नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2021-2022 मधील ऑनलाईन पीकपेरा नमूद असलेला सातबारा उताऱ्यांची मूळ प्रत, आधार कार्ड, बॅक खाते बुक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहितीची नोंदणी वरील ठिकाणी नोंदवावी. संयुक्त खात्यातील क्र.2 नंबर खातेदाराने नोंदणी करीता खातेचा तपशिल दिल्यास पीएफएमएस पोर्टलवरुन पेमेंट पडणार नाही यांची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. शासनाचे खरेदी आदेश मिळाल्यावर शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएसएसद्वारे शेतमाल घेवून येण्याचा दिनांक कळविण्यात येईल. प्रत्येक शेतकऱ्यांकडून फक्त त्यांच्या कुटूंबातीलच (आई, वडील, मुलगा,मुलगी, पत्नी,पती) सातबारा उतारा ओळख पटविल्यानंतर स्विकारण्यात येईल. असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले...
Read Moreके आर चषक ९ वी राज्यस्तरीय सीनियर लगोरी स्पर्धेचे, नंदुरबारला शानदार उद्घाटन
Posted by Ramchandra Bari | Apr 9, 2022 | क्रीडा, व्हिडीओ, शैक्षणिक |
पपई तोडीतून मजुरांना उपलब्ध होत आहे मोठ्या प्रमाणात रोजगार
Posted by Ramchandra Bari | Apr 9, 2022 | कृषी, व्यापार उद्योग, व्हिडीओ |