Author: Ramchandra Bari

तिलाली ग्रामपंचायत सरपंचपदी स्मिता मधुकर पाटील यांची निवड

नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार तालुक्यातील तिलाली (शनिमांडळ) ग्रामपंचायत सरपंच पदावर महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. स्मिता मधुकर पाटील यांची निवड झाली आहे, पालकमंत्री अँड. के. सी. पाडवी, माजी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजितदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली व माजी कृ.उ.बा.समिती चेअरमन डॉ. सयाजी मोरे, माजी जि.प. उपाध्यक्ष शंकरराव मोरे व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष उत्तम पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोमूभैय्या गिरासे, माजी जि.प. सदस्य प्रविण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लाला माला भिल, प्राचार्य डॉ.सी.पी.सावंत, जगन पाटील, दिपक पाटील यांच्या सहकार्याने ही निवडणूक संपन्न झाली. यावेळी तिलाली ग्रामस्थ...

Read More

नंदूरबार जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी सहकार्याचे प्रशासनाचे आवाहन

नंदूरबार (जिमाका) – अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतातील काही भागात मोठ्या प्रमाणावर विवाह आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुद्धा होण्याची शक्यता असते. नंदूरबार जिल्ह्यातही यादिवशी बालविवाह होणार नाही, यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात लागू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात बालविवाह होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पोलीस विभाग, बालकल्याण समिती, बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक, पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका इत्यादी यंत्रणेची मदत घेण्यात येईल. बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 च्या कलम 9 नुसार प्रौढ पुरुषाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास दोन वर्षे पर्यंत सक्षम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कलम दहा नुसार बाल विवाह जुळवून आणणे किंवा जबरदस्तीने बालविवाह लावण्यास प्रवृत्त करणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कलम 11 नुसार बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्या किंवा बालविवाहास परवानगी देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत, होत असल्यास याविषयी नागरिकांनी प्रशासनास सूचित करावे. असे आवाहन श्री. वंगारी यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!