Author: Ramchandra Bari

खरीप पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करा -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) -जिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेच्या व्यवस्थापकांनी खरीप पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला स्टेट बँक इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक सुरजितकुमार सहा, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, ‘नाबार्ड’ चे जिल्हा व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक भारती ठाकूर आदी उपस्थित होते. श्रीमती खत्री म्हणाल्या की, खरीप हंगाम 2022 साठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन देवून 100 टक्के खरीप कर्ज वाटप होईल याकडे बँकेने विशेष प्रयत्न करावे. यासाठी बँकेने अधिकाधिक पीक कर्जाचे मेळावे घ्यावेत. अधिकाधिक वनपट्टेधारकांना पीक कर्जाचे वाटप करावेत. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणिकरण राहीलेल्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम त्वरीत पुर्ण करावे. दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा आणि मोलगी भागात बँक सेवा देण्यासाठी प्रयत्न करावे. या भागातील बॅकेस येणाऱ्या वीज व इंटरनेटची समस्या सोडविल्या जातील. बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, पीएम किसान योजना, मुद्रा योजनेचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा. बँकेच्या दर्शनी भागावर कर्ज प्रक्रियांची माहिती प्रदर्शित करावी. श्री.जयंत देशपाडे म्हणाले की, खरीप हंगामासाठी जिल्ह्यास 603 कोटी 41 लाख रुपयाचे उद्दीष्ट देण्यात आले असून आज पर्यंत 160 कोटी 4 लाख रुपयाचे पीक कर्जांचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बैठकीला विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित...

Read More

जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन

             नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक-2022 कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत नवापूर तालुक्यातील निवडणूक विभाग क्र.52 चितवी व पंचायत समिती अंतर्गत अक्राणी तालुक्यातील निर्वाचक गण क्र.29 असली यांचा समावेश असून त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.          नागरीकांनी आचारसंहिता तक्रारीबाबत दूरध्वनी क्रमांक 02564-210007 वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता तक्रार निवारण कक्षाचे प्रमुख सुधीर खांदे यांनी केले...

Read More

अन्न उत्पादक व्यावसायिकांनी वार्षिक परतावा (डी-1) फार्म ऑनलाईन भरावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अन्न्‍ा सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अन्न व्यवसाय  करणाऱ्या उत्पादक आस्थापनांनी सन 2021-2022 या महसुल वर्षापासुन वार्षिक परतावा फॉर्म डी -1 ऑनलाईन भरावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी केले आहे. फॉर्म डी-1 भरण्यासाठी आपला युझर आय डी व पासवर्ड वापरुन  https://foscos.fssai.gov.in  या सकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. या सुविधेमुळे या वर्षापासून ग्राहकांना डी-1 फॉर्म भरण्यासाठी कार्यालयात ईमेल करणे अथवा कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज राहणार नाही. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांना युझर आयडी व पासवर्ड माहित नसल्यास त्यांनी संकेतस्थळावर भेट देवून फॉरगेट पासवर्ड व लॉगीन आयडी करुन   नविन  लॉगीन आयडी व पासवर्ड तयार  करावा. अन्न व्यवसायीकांना डी-1 फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 30 जून 2022 असुन या तारखेनंतर अर्ज करणाऱ्यांना प्रती दिवस 100 रुपये दंड भरावा लागेल याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी.  वार्षिक परतावा भरण्यास काही तांत्रिक अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र. 1800112100 अथवा [email protected]  या ईमेल आयडीवर संपर्क...

Read More

प्लास्टीक  निर्मुलनासाठी व्यापक जनजागृती करावी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्लास्टीक निर्मुलनासाठी सर्व स्तरातून व्यापक जनजागृती करावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृतीदलाच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता स्वप्निल पाटील, सहायक अभियंता जितेंद्र मोहिते आदी उपस्थित होते. श्री.खांदे म्हणाले की, प्लास्टीकच्या अतिवापरामुळे व विल्हेवाटीमुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असुन प्लास्टीकच्या अविघटनशील कचऱ्यामुळे मोठया प्रमाणात नैसर्गिक अधिवास, पर्यावरण तसेच सागरी जीव, वन्य जीव व मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी प्लास्टीक निर्मुलनासाठी सर्व नागरिकांनी प्लास्टीक पिशवीचा वापर करणे टाळावे. नागरिकांनी भाजीपाला व इतर सामान घेण्यासाठी कापडी पिशव्याचा वापर करावा. यासाठी शैक्षणिक संस्था, एनसीसी, एनएसस, स्काऊट, युवा संघटना, इको क्लब, तसेच स्वंयसेवी संस्थांनी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी. प्लास्टीक कचरा व्यवस्थापन नियम 2021 च्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधीसाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निधीचा वापर करावा. प्लास्टीकच्या बदल्यात बांबू, कापडी पिशवीचा वापर करावा. पर्यावरणपूरक पिशव्या निर्मितीसाठी बचतगट तसेच त्याउत्पादन करणाऱ्या उत्पादकांना प्रोत्साहन करावेत. बंदी घातलेल्या एकल वापर प्लास्टीकच्या पिशव्यासंदर्भात किराणा, दुकानदार, व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात यावी. तसेच बंदी घातलेल्या प्लास्टीकच्या पिशवी विक्रेत्यांवर नगरपालीकेने कठोर कारवाई करावी. प्लेवर ब्लॉक तसेच रस्ता निर्मितीसाठी विघटन करणाऱ्या प्लास्टीकचा वापर करावा असे त्यांनी सांगितले. बैठकीस सर्व मुख्याधिकारी आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!