Author: Ramchandra Bari
प्रकाशा येथे सोनाराच्या दुकानात 7 लाखांची चोरी
Posted by Ramchandra Bari | May 21, 2022 | क्राईम, व्हिडीओ |
तळोदा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील रिक्त पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
Posted by Ramchandra Bari | May 20, 2022 | शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा अंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी पात्र महिला उमेदवारांकडून 31 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तळवे क्रं-3-1, तळवे क्रं-2-1, जामोनीपाडा-1, सावर-1 येथील 4 अंगणवाडी सेविका रिक्तपदासाठी तर गोडाटेंबा-1, हांडबा-1, मोड पु-1, बोरीपाडा-1 अशा 4 अंगणवाडी मिनी सेविका रिक्तपदासाठी तसेच कढेल-1, खर्डी खु-1, मोदलपाडा-1, नळगव्हाण-1, केलवापाणी-1, लाखापूर रे-1 अंगणवाडी केंद्रातील 6 मदतनीस अशा एकूण 14 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. तसेच परिपुर्ण भरलेले अर्ज 31 मे 2022 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा, ता.तळोदा.जि.नंदुरबार येथे सादर करावे. असे रणजित कुऱ्हे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तळोदा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले...
Read Moreजिल्ह्यात मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
Posted by Ramchandra Bari | May 20, 2022 | शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करण्यासाठी नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावणे अनिवार्य असणार आहे, असे सरकारी कामगार अधिकारी अ.ज.रुईकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. राज्यातील सर्व व्यावसायिक दुकाने व आस्थापनेचे नामफलक मराठी भाषेत असण्याकरीता शासनाने अधिसुचना प्रसिध्द केलेली आहे. यानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापनांना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम,2017 च्या कलम 36 क-1 कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकाने व आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम 7 लागु आहे. त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक, देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक असणार आहे. तसेच अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे, देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक लावता येणार आहे. याबरोबरच मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरूवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या दुकाने व आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावे लिहिता येणार नाहीत, अशी तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे. या अधिसुचनेची जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी काटेकोरपणे अंमबजावणी करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ.ज. रुईकर यांनी केले...
Read More